8 new COVID-19 cases in Latur District
8 new COVID-19 cases in Latur District 
मराठवाडा

COVID-19 : लातुरात आठ नवे रुग्ण

हरी तुगावकर

लातूर : जिल्ह्यात आज (ता. तीन जुलै)  213  पैकी 187 जणांच्या कोविड-१९ चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 8 जणांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 9 जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. 1 रद्द केला तर 8  जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 415 झाली आहे. 170 जणांवर उपचार सुरू असून, 225 रुग्ण बरे झाले आहेत. 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 25 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते. त्यापैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. या संस्थेच्या रुग्णालयात एकूण 61 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 25 रुग्ण आहेत. 5 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 36 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. 

आज 4 रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 3 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते एक रुग्ण 13 दिवस व्हेंटिलेटरवर होता. व दूसरा रुग्ण 10 दिवस अतिदक्षता विभागात होता व उर्वरीत एक रुग्ण 4 दिवस व्हेंटिलेटरवर होता व दूसरा रुग्ण 6 दिवस व्हेंटिलेटरवर होता त्याचे  डायलिसिस करण्यात आले होते  या सर्व रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरन कक्षाचे प्रमुख डॉ.  रामराव मुंढे यांनी दिली.

  • एकूण बाधित - ४१५
  • उपचार सुरु असलेले - १७०
  • बरे झालेले - २२५
  • मृत - २०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT