Parbhani News
Parbhani News  sakal
मराठवाडा

Parbhani News : आईच्या स्मरणार्थ मुलांनी उभारली शाळेची इमारत ; मोदानी बंधूंचा पुढाकार,पाथरीतील गुंज येथील विद्यार्थ्यांची दैना फिटणार

सकाळ वृत्तसेवा

पाथरी : आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या घटना घडत असताना केवळ आईच्या स्मरणार्थ मोदानी बंधूंनी आपल्या मूळगावी गुंज येथे पूर्ण शाळा बांधून दिली आहे. गुरुवारी या नवीन शाळा इमारतीचे लोकार्पण होत आहे.

गुंज (पाथरी) येथे मागील २४ वर्षांपासून चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय ही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंतच्या या शाळेत गुंज व पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; पण शाळेला स्वतःची इमारत नसल्याने जायकवाडीच्या इमारतीत वर्ग भरत असत.

२०१८ मध्ये योगानंद महाराज संस्थानचे राजेशभाई महाराज यांनी दोन एकर जागा शाळेस दान दिली. जागेचा प्रश्न सुटला असला तरी संस्थेला इमारत बांधणीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गुंज येथील भूमिपुत्र दिवंगत आसाराम मोदानी यांचे छत्रपती संभाजीनगर स्थित पुत्र बाबूलाल, दयानंद, रामानंद आणि परमानंद मोदानी यांनी आई शांताबाई मोदानी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण शाळा बांधकाम करण्याचा निर्णय घेत अवघ्या सहा महिन्यांत शाळेला दहा वर्गखोल्या बांधून दिल्या. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

मोदानी बंधूंनी गावातील शाळा बांधून देऊन गुंजसह आजूबाजूच्या गावांतील मुला-मुलींच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. याचे सर्व ग्रामस्थांना कौतुक आहे. त्यांचे हे कार्य भावी पिढीसाठी आदर्शवत ठरणार आहे.

- संगीता तांगडे, सरपंच, गुंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT