electricity sakal
मराठवाडा

Beed News : चोरट्यांचा महावितरणला शॉक ; चालू रोहित्रांतील ऑइल चोरीसह नासाडी

चोरट्यांनी आता आपला मोर्चा महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांकडे वळविला आहे. रोहित्रांतील ऑइल चोरीसह ऑइल सोडून त्याची नासाडी करण्याचे प्रकार शहरात समोर आले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाणे व पेठ बीड पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

बीड : चोरट्यांनी आता आपला मोर्चा महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रांकडे वळविला आहे. रोहित्रांतील ऑइल चोरीसह ऑइल सोडून त्याची नासाडी करण्याचे प्रकार शहरात समोर आले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाणे व पेठ बीड पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले.

सध्या थंडी व हिवाळी भजनांचा हंगाम असल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यातच आता चोरट्यांनीही रोहित्रांनाच लक्ष्य केल्याने महावितरणलाच शॉक बसला आहे. दरम्यान, शहरातील जालना रोडवरील सेंट अॅन्स स्कूल या कायम वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या रोहित्रातील ४०० लिटर ऑइल चोरट्यांनी लंपास केले.

विशेष म्हणजे वीजपुरवठा सुरु असताना चोरट्यांनी हे कृत्य केले. याबाबत महावितरणचे सहायक अभियंता संतोष राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ३६ हजारांच्या ऑइल चोरीचा यात उल्लेख आहे.

तर, यानंतर आता पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीतील तिरुमला उद्योगाच्या बाजूला असलेल्या २०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातील तब्बल ६४० लिटर (५७ हजार ६००) रुपयांचे ऑइल चोरट्यांनी नासाडी केले आहे. रोहित्राचा कॉक फिरवून हे ऑइल खाली सोडून देण्यात आले. याबाबत सहायक अभियंता गणेश पारीख यांनी पेठ बीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT