hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli News : औंढा नागनाथहून तरुणाचा सायकलवारीने अयोध्या प्रवास

औंढा येथील रामभक्त लला देव हा सायकलवरून जवळपास हजारो किलोमीटर प्रवास करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : येथील नागनाथाचे दर्शन घेऊन प्रथमेश उर्फ लल्ला देव हा युवक अयोध्या नगरीकडे सकाळी पाच वाजता श्री नागनाथाचा अभिषेक व महापूजा करून रवाना झाला आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामाची मूर्ती स्थापना व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. देशभरातून अनेक रामभक्त या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत. त्यानुसार औंढा येथील रामभक्त लला देव हा सायकलवरून जवळपास हजारो किलोमीटर प्रवास करणार आहे.

तो सकाळी नऊ वाजता हिंगोली येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी आमदार संतोष बांगर यांनी त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख, नगरसेवक राहुल दंतवार, सुबोध देशपांडे, बाबाराव सावळे, शंकर यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT