Accident News  
मराठवाडा

Accident News : भीषण अपघात! वाहत्या कालव्यात ट्रॅक्टर कोसळला; दोघे भाऊ...

सकाळ वृत्तसेवा

वैजापुर : वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर चक्क 'नांमका'च्या वाहत्या कालव्यात कोसळल्याने दोन चुलत भाऊ पाण्यात पडले. यातील एक जण प्रवाहासोबत वाहुन गेला तर दुसऱ्याने आधार शोधल्याने त्यांचा जीव वाचला. ही दुर्घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसगाव शिवारात महालगाव- शिरसगाव रस्त्यावर घडली.‌

मोहन छबु धात्रक (वय ३५, रा.शिरसगाव) हा तरुण पाण्यात कऊटगावच्या दिशेने वाहुन गेला असुन घटनेनंतर सात तासानंतरही त्याचा शोध लागला नव्हता. विरगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल व्ही. एम. बामंदे व जी. आर. थोरात, पोलिस पाटील महेश निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, मोहन धात्रक व त्यांचा चूलत भाऊ अरुण धात्रक हे दोघे गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने महालगावकडुन शिरसगावच्या दिशेने जात होते.‌ या रस्त्याने जात असतांना पुलाजवळ वळण घेतल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व हा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला.

सध्या पाटबंधारे विभागाने जलदगती कालव्यातुन पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले आहे. त्यामुळे कालव्यातुन वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु आहे.‌ दोघेही पाण्यात पडल्यानंतर अरुण धात्रक याने लगेचच लोखंडी ॲंगलचा आधार घेतल्याने त्याचा जीव वाचला तर मोहन धात्रक हा प्रवाहाबरोबर वाहुन गेला. पोलिसांनी त्यांचे शोध कार्य सुरु केले आहे. या घटनेमुळे शिरसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शोधकार्य सुरु आहे...

घटनेनंतर पाण्यात वाहून गेलेल्या मोहन धात्रक यांचा शोध घेणे सुरु आहे.मात्र,कालव्यात पाण्याचा वेग अधिक असल्याने तपास कार्यात अडचणी येत असल्याची माहिती विरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT