Accident News esakal
मराठवाडा

Accident News : वैजापूर-गंगापूर रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे ठार; दोघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले ही दुर्घटना शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर रस्त्यावर घडली.

सागर शिवसिंग राजपूत (वय २५ रा.परदेशी गल्ली), साहिल दत्तात्रेय पगारे (वय २२ रा.शिर्डी) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, शुभम साबळे (वय २० रा.पंचशील नगर), अजय दुशिंग (वय २२ रा.शिर्डी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, सागर राजपूत हा रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर चौफुली येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकीवर येत होता. त्यावेळी सभांजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीशी धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची

माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब, विरोधकांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT