Accidental death due to electrical shock
Accidental death due to electrical shock  
मराठवाडा

शेजारच्या वीजचोरीने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव

सकाळवृत्तसेवा

आष्टी (जि. बीड) - शेतातील पिकांना पाणी देणा-या बोअरवेलसाठी शेजारी शेतकर्याने विद्युत वाहिनीवर आकडा टाकून आणलेल्या उघड्या वायरवर पाय पडून तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 22) रात्री उशिरा तालुक्यातील देसूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

कुमार रवींद्र आबनावे (वय 14 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्देवी मुलाचे नाव आहे. याबाबत चार जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तालुक्यातील देसूर येथे रवींद्र हिरालाल आबनावे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून त्यांना वडिलोपार्जित अर्धा एकर जमीन आहे. खासगी कंपनीत नोकरीनिमित्त ते पत्नी व दोन मुलांसह पुणे येथे राहतात. किरण व कुमार अशा त्यांच्या दोन अपत्यांपैकी कुमार हा शाळेला सुट्टी लागल्याने दीड महिन्यांपूर्वी गावी देसूर येथे आला होता. 

मंगळवारी (ता. 22) कुमार हा चुलते प्रमोद आबनावे यांच्यासह घराशेतातील शेतात उसाला पाणी देत होता. पांदीकडील बाजूने सरीचे पाणी पोहोचले की नाही हे पाहण्यासाठी कुमार गेला. बराच वेळ होऊनही परत न आल्याने प्रमोद यांनी त्याला आवाज दिले. परंतु, प्रतिसाद न आल्याने प्रमोद हे स्वतः उसाच्या शेताकडे गेले. या वेळी कुमार उसाच्या शेतामधील पाण्यात बेशुद्धावस्थेत पडलेला त्यांना आढळला. त्याच्या कमरेखाली काळ्या रंगाचे विद्युत वायर चिकटल्याचे तसेच कपडे जळाल्याने त्यातून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वायरची पाहणी केली असता जवळून गेलेल्या विजेच्या तारेवर वायरच्या सहाय्याने आकडा टाकल्याचे, तसेच उघड्या पडलेल्या वायरवर कुमारचा पाय पडल्याचे त्यांना दिसले. 

प्रमोद यांनी कुमारच्या अंगाला चिकटलेले वायर त्यांनी बांबूच्या सहाय्याने बाजूला करून कुमारला बाजूला शेतात आणले. बेशुद्धावस्थेत त्याला उपचारांसाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत प्रमोद आबनावे यांनी बुधवारी (ता. 23) आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश विठ्ठल आबनावे, विशाल अंकुश आबनावे, अलका अंकुश आबनावे व शांताबाई विठ्ठल आबनावे या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT