Suryakant Gaikwad, Mahtab shekh Sakal
मराठवाडा

किनगाव येथील दोघांचा अपघाती मृत्यू

अपघाताचे कारण अस्पष्ट

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि. लातूर) - तालुक्यातील किनगाव येथील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) घडली आहे. किनगाव येथील कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय असणारे सूर्यकांत नरहरी गायकवाड (46 वर्ष) व महताब अल्लाबक्ष शेख (39 वर्ष) हे दोघेजण शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता काही कामानिमित्त किनगाव येथून धर्मापुरीला गेले.काम आटोपून ते परत किनगाव कडे निघाले असता संध्याकाळी आठच्या सुमारास कांगणेवाडी ( ता.अंबाजोगाई) येथे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. होंडा कंपनीची मोटारसायकल असून महताब अल्लाबक्ष शेख चालवत होते तर सूर्यकांत गायकवाड मोटारसायकलवर मागे बसले होते.

अपघाताचे कारण अस्पष्ट, अपघात ठिकाणी बैलगाडी

मोटारसायकलला अज्ञात वहानाने धडक देऊन गेले का? हे दोघे स्वता घसरून पडले का ? हे आणखी स्पष्ट झाले नाही तरी या दोघांनी थांबलेल्या बैलगाडीला धक्का दिला असेल असा अंदाज नागरीक व्यक्त करीत आहेत. अहमदपूर- अंबाजोगाई हा रस्ता सिमेंट काॅक्रेटचा झाला आहे.या रस्त्यावरून वहाने वेगाने धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोघेही मन मिळाऊ स्वभावाचे असल्याने या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्यावर शनिवारी किनगाव येथे अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT