file photo 
मराठवाडा

घातक शस्त्रास्त्रासह आरोपी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

परभणी : चार घातक शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. २१) रात्री छापा मारून तुराबुल हक्क नगरातील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चार घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ निघालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तुराबुल हक्क नगरातील रहिवाशी रिझवान अली खान अदिल अली खान हा त्याच्या घरी घातक शस्त्र बाळगत आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला असता, त्या ठिकाणावरून म्यान असलेली एक तलवार, लोखंडी जांबिया सापडला. 

बुलेटच्या फुटस्टॅंड व सिटजवळ तलवार
त्यानंतर लगेच आरोपी मुसदीख खान ऊर्फ मुशूखान ऊर्फ खासाब पिता नुरुल्लाखान बजदानी राहत्या घरी छापा घातला. या वेळी त्याच्या अंगणातील उभ्या असलेल्या गजगा रंगाच्या रॉयल इनफिल्ड संशयित बुलेट गाडीची झडतीची घेतली असता बुलेटच्या फुटस्टॅंड व सिटजवळ एक धारदार तलवार, एक लोखंडी रॉड त्यास वेल्डिंगद्वारे अर्धवर्तुळाकार अनुचुकीदार दात्रे असलेले घातक शस्त्र सापडले.


पोलिसांनी चारही शस्त्रे व बुलेट जप्त केली आहे. या दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, दिनेश मुळे, फौजदार किशोर नाईक, पोलिस कर्मचारी शरद मुलगीर, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, बालासाहेब तुपसुंदरे, अरुण पांचाळ, जमिरोद्दिन फारुखी, शेख अजहर, हुसेन खान, परमेश्वर शिंदे, दिलावर पठाण, भगवान भुसारे, विशाल वाघमारे, आशा शेल्हाळे, अनिल कोनगुलवार, वशिष्ठ बिक्कड, सारंग बनकर यांनी केली.

हेही वाचा ....


बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा

परभणी : पालम शहरातील पाटील नगरमध्ये बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) दुपारी छापा मारून नऊ हजार ९५७ रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे.

पाटील नगरमधील राहत्या घरी एक इसम बनावट दारू तयार करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथक तयार करून या ठिकाणी शनिवारी (ता. २२) छापा मारला. त्या घरात बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले. 

नऊ हजार ९५७ रुपयांची बनावट दारू जप्त
पोलिसांच्या पथकाने अल्कोहोल, पाणी, देशी दारूमिश्रित जारसह १८० मिलीच्या रिकाम्या देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या जप्त केल्या. बॉटलमध्ये सदरील जारमधील मिश्रण भरत असताना मिळून पोलिसांच्या निदर्शनास आले. देविदास सीताराम गायकवाड, केरबा व्यंकटी वाघमारे, प्रणव प्रकाश दावळबाजे, अनिकेत लक्ष्मण घोरपडे, गंगाधर चिमणाजी जिकलवाड या आरोपींनी दारू जप्त केल्या. सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शरद विपट, पोलिस कर्मचारी मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, संजय शेळके, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन व अरुण कांबळे यांनी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Raina and Dhawan : मोठी बातमी! सुरेश रैना, शिखर धवनला ‘ED’चा दणका ; तब्बल ११.१४ कोटींची संपत्ती जप्त!

Stock Market Closing : आज शेअर बाजार लाल रंगात बंद! निफ्टी अन् सेन्सेक्स कितीवर? पाहा एका क्लिकमध्ये.

Sanjay Raut: '...हा आमच्या पिढीचा मंत्र होता'! हाताला सलाईन, पण बोटांमध्ये पेन धरलं; रुग्णालयातून संजय राऊतांकडून फोटो शेअर

Latest Marathi Live Update News : पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध बांगलादेशी महिला ताब्यात; मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू....

Margashirsha Month 2025: मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही करू नका हे काम! वाचा काय करावं आणि काय टाळावं

SCROLL FOR NEXT