Crime News esakal
मराठवाडा

Hingoli News : अप्पर जिल्हाधिकारी प्रकरणातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

येथील सहा जणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील अप्पर जिल्हाधिकारी प्रकरणातील आरोपींना सोमवारी ता. २० न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आहे. तर तोतया अपर जिल्हाधिकारी व त्याच्या साथीदाराने औरंगाबाद येथील सहा जणांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

बनावट उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका छापून हिंगोली जिल्ह्यातील १८ ते २० जणांची १.१६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याने तोतया अपर जिल्हाधिकारी अमोल पजई - मराठे, अनंता कलोरे व अन्य एकावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कच्छवे, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार,

सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने सोमवारी त्यांची अधिक चौकशी सुरू केली. यामध्ये त्यांनी औरंगाबाद येथील सहा जणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी आठ लाख असे सहा जणांकडून ४८ लाख घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद येथील तरुणांनीही याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून फसवणुकीची माहिती दिली. त्यानंतर आता या प्रकरणात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्री. जिव्हारे, गुन्हे शाखेचे जमादार सुनील अंभोरे, संभाजी लकुळे, किशोर सावंत, भगवान आडे, शेख शकील यांच्या पथकाने अमोल पजई वापरत असलेली इनोव्हा कार अकोला येथून जप्त केली.

पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता तो यापूर्वी पुणे येथे नोकरीला होता. त्या ठिकाणी त्याला १५ हजार रुपये महिना वेतन मिळत होते. मात्र कलोरे याने त्याला २५ हजार रुपयांचे वेतन देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजीच तो चालक म्हणून आला होता. त्याचा या प्रकरणात कुठेही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिल १२९ धावांवर नाबाद, तरीही टीम इंडियाने डाव घोषित केला! यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकल्याची सल...

त्यांच्या हातचा तो पदार्थ मी रोज खाऊ शकते... शिवानी सोनारने केलं सासूबाईंचं कौतुक; म्हणाली- नवीन लग्न...

Anil Ambani Group: अनिल अंबानींचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; प्रशासनाकडून २३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

IND vs WI 2nd Test: कॅप्टन शुभमन गिलचं खणखणीत शतक; रोहित शर्माला मागे टाकून धोनी-गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT