मराठवाडा

किनवट तालुक्यात वन तस्कऱ्यांविरोधात कारवाई

नवनाथ येवले

नांदेड : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील किनवट तालुक्यातील चिखली येथे शनिवारी (ता.2) पहाटेपासून वन तस्कऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 'ऑपरेशन ब्लू मून टू' अंतर्गत वनविभाग, पोलिस दल आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत सुमारे 21 ट्रॅक्टर सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. या सागवानाच्या किमतीची मोजदाद सुरू आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी (ता. एक) रोजी वन विभागाकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्याला ऑपरेशन 'ब्ल्यू मून' हे नाव देण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता 'ब्ल्यू मून टू'अंतर्गत वन तस्कऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे. किनवट वनपरिक्षेत्रातील चिखली तांडा येथे पहाटे पाचपासून 250 वन कर्मचारी, 125 पोलिस कर्मचारी, 30 एसआरपीचे जवान अशा सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सुरू असलेल्या
'ब्लू मून टू'चे नेतृत्व उप वनसंरक्षक आशिष ठाकरे करत आहेत.

दरम्यान, सायंकाळपर्यंत किमती सागवानाच्या लाकडांची मोजदाद केली जाणार असल्याने नेमक्या किमतीचा आकडा पुढे येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

SCROLL FOR NEXT