जालना : अग्रवाल समाजाच्या 'अग्र महाकुंभ' अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना राष्ट्रसंत सुधांशू महाराज. सोबत शांतीलाल मुथा, विजयकुमार चौधरी, सुभाषचंद्र देविदान, घनश्‍याम गोयल, पुरुषोत्तम जयपुरिया, मालती गुप्ता,
जालना : अग्रवाल समाजाच्या 'अग्र महाकुंभ' अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना राष्ट्रसंत सुधांशू महाराज. सोबत शांतीलाल मुथा, विजयकुमार चौधरी, सुभाषचंद्र देविदान, घनश्‍याम गोयल, पुरुषोत्तम जयपुरिया, मालती गुप्ता,  
मराठवाडा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दत्तक घेणार 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्यासह त्यांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव अग्रवाल समाजाच्या 'अग्र महाकुंभ' प्रांतीय अधिवेशनात रविवारी (ता.पाच) घेण्यात आला. याशिवाय अग्रवाल समाजाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह एक कुटुंब, एक झाड असे ठरावही एकमुखाने संमत झाले. 

शहरातील दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य अग्रवाल समाजाच्या दोनदिवसीय 'अग्र महाकुंभ प्रांतीय अधिवेशनाचा समारोप राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, संयोजन समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, स्वागताध्यक्ष घनश्‍याम गोयल, महामंत्री पुरुषोत्तम जयपुरिया, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, अग्रोहा विकास संस्थानचे अध्यक्ष शीतलकुमार अग्रवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष रमाकांत खेतान, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, नारायणदास अग्रवाल, गोपाल अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, प्रांतीय महिला अध्यक्षा मालती गुप्ता, सतीश बगडिया, नंदकिशोर मोदी, महेंद्र पोद्दार, उषा अग्रवाल आदींची उपस्थिती होती. 

चार महत्त्वपूर्ण ठराव
या अधिवेशनात चार महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. कोणत्याही शहरात वृद्धाश्रम उघडले जाऊ नये. आई-वडील आणि आजी-आजोबा हा कुटुंबातील महत्त्वाचा भाग आहे. हा संस्कार तरुण पिढीला देण्यात यावा. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन त्यातील काही मुलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव या अधिवेशनात घेण्यात आला. याबरोबरच अग्रवाल समाजातील तरुणांच्या बेरोजगारीचे निराकरण करण्यासाठी त्यांना योग्यतेनुसार रोजगार देणे, समाजातील तरुणांना अध्यात्माशी जोडून संस्कारक्षम करण्याचा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने किमान एक रोप लावावा, असा ठराव घेण्यात आला. 

पुरस्कार वितरण उत्साहात 
या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अग्रवाल समाजातील मान्यवरांना राष्ट्रसंत सुधांशू महाराज, शांतीलाल मुथा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रमाकांत खेतान यांना जीवनगौरव, तर डॉ. सुशील भारुका (जालना), रतनलाल गोयल (पुणे), कमलकिशोर झुनझुनवाला (जालना), पवनकुमार मित्तल (जळगाव), सागर रामेश्वर मोदी (खामगाव), श्रीनिवास अग्रवाल (इचलकरंजी), दीपक अग्रवाल (अमरावती), डॉ. जगदीश गिंदोडिया (धुळे) यांना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

समाजसेवा हाती घ्यावी : सुधांशू महाराज
सामाजिक कार्यात अग्रवाल समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढेही सामाजिक कार्यात अग्रवाल समाजाने एकजूट दाखवून समाजसेवा हाती घ्यावी. असे मत राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मित्तल व डॉ. अनिता तवरावाला यांनी केले

अग्रवाल समाजाने नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन प्रगती करण्याची शिकवण अग्रेसन महाराजांनी दिली आहे. जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त मुलांना शिक्षण, दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाचे कामे यासह अन्य सामाजिक कामात नेहमी पुढाकार घेतला आहे. या कामात अग्रवाल समाजाची मोठी साथ लाभली आहे. अशाप्रकारच्या अधिवेशनाच्या माध्यमातून समाजात भाईचारा वाढीस मदत होणार आहे. 
- शांतीलाल मुथा, 
संस्थापक, भारतीय जैन संघटना 

अग्रकुंभ प्रांतीय अधिवेशनाच्या निमित्ताने नवीन संकल्पना राबवण्यात आल्या. या संकल्पना नक्कीच भविष्यात समाजबांधवांसाठी फलदायी ठरेल. 
-सुभाषचंद्र देविदान, अध्यक्ष संयोजन समिती 

सामाजिक क्षेत्रात अग्रवाल समाजाचे मोठे योगदान आहे. सामाजिक कामात अग्रवाल समाजाने नेहमीच एकजूट दाखवली आहे. विविध क्षेत्रात अग्रवाल बांधवांनी शहराचा नावलौकिक केला आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचा योग आला आहे. त्यामुळे हे अधिवेशन कायमस्वरूपी स्मरणात राहील. 
-पुरुषोत्तम जयपुरिया, 
महामंत्री संयोजन समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT