मराठवाडा

अहमदपूर तालुक्यातील 27 तलाव भरले, शेतीशिवार पाणीमय

अहमदपूर तालुका व परिसरात मुसळधार पावसामुळे भाजीपाला व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि. लातूर) - तालुका व परिसरात मुसळधार पावसामुळे भाजीपाला व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  नदीकाठच्या शेती मध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे.मागील चार दिवसपासून रात्रंदिवस होत असलेल्या पावसाने नदी, नाले, तलाव तुडुंब भरले  आहेत.

तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने गेल्या  आठवड्याभरापासून दिवसभर रात्रभर झोडपत असल्याने तालुक्यातील साठवण तलाव, लघु तलाव 27 तलाव तुडूंब भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहेत. तालुक्यात सतत होणाऱ्या प्रजन्यमानामुळे पावसाची सरासरी ओलांडली असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 700 मिलीमीटर इतके असून 28 सप्टेंबर अखेर तालुक्यात 970 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरल्याने सोयाबीन काढता येत नाही तर कांही शिवारात कापसाची फुले व बोंडे गळून जाऊन कापूस जमीनीवर पडला आहे. या संततधार पावसाने तालुक्यातील अनेक तलाव भरुन सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे.तालुक्यातील मोघा नदीला पुर आल्याने अहमदपूर - मोघा तर मन्याड नदीला पुर आल्याने किनगाव- लातूर रास्ता बंद झाला आहे.

तालुक्यातील सहा मंडळात आतापर्यंत झालेला मिलीमीटर मधे झालेला पाऊस.

  • अहमदपूर - 837

  • किनगाव - 921

  • अंधोरी - 779

  • खंडाळी - 1272

  • शिरूर ताजबंद - 1064

  • हाडोळती - 841

खंडाळी महसुल मंडळात सर्वाधिक पाऊस झाल्याने या मंडळातील खंडाळीसह, धसवाडी, नागझरी, रूध्दा, सुमठाणा, शेनकूड, उजना, गंगाहिप्परगा, वडारवाडी, जोडवाडी, सांगवी-सुनेगाव हगदळ -गुगदळ वरवंटी, शिंदगी, मांगदरी, रूई, राळगा आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचले असून सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पिकवीमा व नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT