File photo 
मराठवाडा

Video : सव्वा कोटीची ऊस तोडणी मशीन जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.नांदेड) :  अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रूक येथे ऊस तोडणी सुरू असतांना ऊस तोडणी यंत्रात बिघाड झाल्यानंतर यंत्राला आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत यंत्र जळून राख झाले आहे. यामुळे यंत्र मालकाचे सुमारे सव्वा कोटींचे नुकसान झाले आहे. 

ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे बऱ्याच साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. पुर्णा सहकारी साखर कारखान्याकडे पाच ऊस तोडणी यंत्रे आहेत. सध्या या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यासाठी कामठा (ता.अर्धापूर, जिल्हा नांदेड) शिवारातील बालाजी स्वामी यांच्या शेतात ऊस तोडणी या यंत्राच्या सहाय्याने सुरु असतांना वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने यंत्राने पेट घेतला व हे यंत्र आगीच्या भक्षस्थानी पडले. या यंत्राची सुमारे सव्वा कोटी किमत आहे. तसेच यंत्रासोबत ऊसालाही आग लागली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.

प्रसंगावधानामुळे चालक वाचला
पुर्णा सहकारी साखर कारखान्याकडे कारखाण्याच्या दोन व खासगी मालकांच्या तीन अशी पाच ऊस तोडणी यंत्रे आहेत. वाघी (ता.नांदेड) येथील राजाराम नरडीले यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी ऊसतोडणी यंत्र खरेदी केले आहे. चालु हंगामात गेल्या दहा दिवसांपासून ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. कामठा बुद्रूक येथे ऊस तोडणी सुरू असताना ही घटना झाली आहे. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने शिवप्रसाद नरडीले यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी विजय आवरदे, संगमनाथ मुस्तरे, कमलाकर कनगिरे यांनी तातडीने दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.  यंत्र चालकाने प्रसांगावधान दाखवून उडी मारल्याने त्याचा प्राण वाचला आहे.

रक्कम फेडण्याची चिंता
वाघी येथील नरडीले यांनी कुटुंबाला अर्थिक आधार व्हावा, यासाठी ऊसतोडणी यंत्र सहा वर्षांपूर्वी खरेदी केले.गेल्या सहा वर्षांपासुन यंत्राची रक्कम फेडण्यासाठी कष्ट करित आहेत. तसेच यंत्राची देखभाल दुरूस्ती स्वतः करतात. अचानक यंत्राला आग लागल्याने मोठा अर्थिक फटका बसला आहे. कुटूंबाचा मोठा अर्थिक आधार गेल्याचे नरडीले कुटुंबियांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT