फोटो
फोटो 
मराठवाडा

रक्षकांच्या रक्षणासाठी सॅनिटायझरचे वाटप- एसपी मगर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊन आणि त्यापाठोपाठ उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णालयात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि रस्त्यावर पोलीस कर्मचारी सदैव जागरुकतेने आणि जीव जोखमीत घालून आपले रक्षण करत आहेत. या रक्षकांचेही कोविड -१९ या कोरोना विषाणूपासून रक्षण करता यावे यासाठी पोलीस दलाचे पालक म्हणून पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर हे आपल्या दलातील प्रत्येकाची काळजी घेत आहेत. 

त्यासाठी सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे. भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ३०० लिटर सॅनेटायझर वाटप करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा पुढाकार

सध्या कोरोनाचा प्रतिबंध व्हावा म्हणून नागरिकांसाठी पोलिस दल मदतीला आपल्या जीवाची पर्वा न करता हे पोलीस रोज रस्त्यावर आपल्यासाठी तत्पर आहेत. खाकी वर्दीतला अधिकारी किंवा कर्मचारी हा देखील माणूसच आहे. त्यासाठी पोलीसांच्या आरोग्याची काळजीही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घेतली आहे. कोरोनाच्या आपत्तीसोबत दोन हात करताना सॅनिटायजर लावलेले हात हे देखील महत्त्वाचे ठरत आहेत. 

भोकर उपविभागात ३०० लिटर सॅनिटायझर वाटप

यामुळे भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ३०० लिटर सॅनिटायझर वाटप केलेले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, पोलीस स्टेशन मोटार व परिवहन विभाग यांच्या विविध शाखा व कार्यालय परिसरात जंतुनाशक फवारणीसाठी पंप वाटप केले आहेत. या पंपाद्वारे फवारणी करण्यात येत असून कार्यालयाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

जवानांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी 

कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना हँडवाश वाटप केले. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी पोलिसांना मास्क, चष्मे  इ. साहित्य देण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. कर्तव्यावर असणाऱ्या नांदेड शहरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य ठिकाणावर जेवण पोहोचविले जात आहे. आपल्या दलाच्या जवानांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी नांदेड पोलिस दल तत्पर आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT