मराठवाडा

मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, चौघजण जखमी

सकाळ वृत्तसेवा

पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने गाय जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. एक) रात्री बाह्यवळणाच्या उड्डाणपुलावर घडली.

चौंढाळा (ता. पैठण) येथील शशिकला शहादेव दवणे (वय 28) ही महिला दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने घाटीत उपचारार्थ दाखल करण्यात आली होती. उपचारादरम्यान शशिकला यांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह चौंढाळा (ता. पैठण) या त्यांच्या गावी रुग्णवाहिकेद्वारे (एमएच- 20, डब्ल्यू- 9636) नेण्यात येत होता. ही भरधाव वेगातील रुग्णवाहिका पाचोडच्या बाह्यवळण रस्त्याजवळ आली असता अचानक समोरून दुभाजकावरून गाय आडवी आली. त्यामुळे रुग्णवाहिकेचे चालक ज्ञानेश्वर चव्हाण (वय 42, रा. औरंगाबाद) यांचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले. सदरील रुग्णवाहिका गायीला जाऊन धडकली. यात ही गाय जागीच ठार होऊन ही रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.

यात रुग्णवाहिकेचा पूर्णतः चुराडा होऊन चौघे जण जखमी झाले. यामध्ये रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश मार्कस्‌ आठवले, सुरेखा मार्कस्‌ आठवले (वय 32), फुलाबाई रोहिदास वाघ (वय 55, सर्व रा. चौंढाळा, ता. पैठण) यांचा समावेश असून या सर्वांना आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच पाचोड पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. पोलिस व ग्रामस्थ यांनी माणुसकी म्हणून पुढाकार घेत रुग्णवाहिकेतील मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पाचोड येथील खासगी वाहनाची पर्यायी व्यवस्था करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT