पशुवैद्यकीय रुग्णालयांत खरेदी केलेल्या सुयांचे बॉक्‍स.
पशुवैद्यकीय रुग्णालयांत खरेदी केलेल्या सुयांचे बॉक्‍स. 
मराठवाडा

माहिती येईना,अहवाल जाईना

सकाळवृत्तसेवा

बीड - पशुसंवर्धन विभागात विशिष्ट हेतूने सुयांची खरेदी केली खरी; पण सुयांच्या बॉक्‍सवरील ‘फॉर द युज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गुजरात - नॉट फॉर सेल’ या ठळक मजकुराने सगळा घोळ केला. ‘सकाळ’ने भंडाफोड केलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असली तरी कंपनीकडून लॉट नंबरची माहिती यायला उशीर होत असल्याने या प्रकरणाचा अद्याप सीईओंपर्यंत अहवाल गेला नाही.

पशुसंवर्धन विभागाकडे असलेला निधी मार्च एंडच्या अगोदर खर्च केल्याचे दाखविण्यासाठी लसीकरणासाठी गरज म्हणून सुयांच्या खरेदीचा मार्ग अवलंबिला गेला. या घाईत खर्चाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मान्यताही घेतली नाही. 

स्थानिक पातळीवरील खरेदी असताना एका विशिष्ट उत्पादित कंपनीची आणि ठराविक एजन्सीकडूनच ही सुयांची खरेदी झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या गौडबंगालाची चर्चा सुरू झाली. मात्र, या ‘टायगर सर्जिकल डिस्पोजेबल प्रा. लि.’ या उत्पादित कंपनीच्या ‘अलय फार्मा’ या पुरवठादार एजन्सीकडून हा पुरवठा झालेल्या सुयांच्या बॉक्‍सवर ‘फॉर द युज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गुजरात - नॉट फॉर सेल’ असा ठळक मजकूर होता. या प्रकाराचे १८ ऑगस्टच्या अंकात ‘सकाळ’मधून ‘पशुसंवर्धन विभागाचे गुजरात कनेक्‍शन’ या वृत्तातून भंडाफोड केला. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनजराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अशा तिघांची चौकशी समिती नेमली.

अधिकाऱ्यांचे जबाब, खरेदीच्या पावत्या जमा
समितीने स्थानिक अधिकाऱ्यांचे जबाब, खरेदीच्या पावत्या जमा केल्या आहेत. याच्या इतर बाबींची चौकशीही केली. मात्र, गुजरात कनेक्‍शन मागे नेमके काय दडलेय याचा शोध सुरू आहे. त्यामुळे कंपनीकडून गुजरात राज्यात पुरवठा केलेल्या सुयांच्या लॉट नंबरची यादी मागविली आहे. मात्र, ही माहिती न आल्याने समितीचा अहवाल अद्यापही अपूर्ण आहे. सरकारी प्रशासनाकडून मागितलेल्या माहितीला विलंब कसा, उत्पादक आणि पुरवठादार ही बाब गांभीर्याने कशी घेत नाहीत, याचे कोडेही पडले आहे. आता अहवाल कधी जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT