Nanded News 
मराठवाडा

Video : गणिताच्या जादुगाराची अशीही जयंती...कशी ते वाचा व बघा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गणिताचे जादुगार श्रीनिवास रामानुजन यांची रविवारी (ता.२२) जयंती साजरी करण्यात आली. नांदेडमध्ये मात्र इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिक्स सायन्सच्या वतीने पहिले राज्यस्तरीय प्रदर्शन भरवून रामानुजन यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. 

विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भिती दूर व्हावी, त्यांच्यातील वैज्ञानिक कौशल्याला चालना मिळावी यासाठी नांदेड येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिक्स सायन्सच्यावतीने पहिले राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. छत्रपती चौकातील देवकृपा फंक्शन हॉलमध्ये हे प्रदर्शन बघण्यासाठी दिवसभर खुले होते. यामध्ये शहरातील विविध शाळांतील ६० विद्यार्थ्यांनी समाजातील ज्वलंत विषयांवर प्रकल्प तयार करून उपाय सुचवलेत. त्यात रोबोट, सौरऊर्जा, अपघात कसे टाळता येतील, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, भूकंप कसा होतो. कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे, पाण्याची बचत कशी करायची असे विविध प्रकल्प तयार करून त्याची माहितीही या बालवैज्ञानिकांनी प्रात्यक्षिकांसह दिली. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प हे टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले होते.  

याशिवाय राज्यस्तरीय संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘आनंदी आणि भयमुक्त शिक्षण’, ‘विज्ञान आणि गणित प्रदर्शन’, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रणालीद्वारे शिक्षण’, ‘दहावी बोर्ड परीक्षेचे पुण्याच्या तंज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन’, ‘आयआयटी-जेईई-निटचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन’, चमत्कारा मागील विज्ञान’, एमपीएस्सी, युपीएस्सी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, परदेशी भाषा शिक्षणाचे मार्गदर्शन, रोबोटीक व ड्रोन निर्मिती तंत्र, कुशल उद्योजक कसे बनावे अशा विविध विषयांवर विचारमंथन झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT