Another murder case was also revealed in the investigation of the murder of former corporator
Another murder case was also revealed in the investigation of the murder of former corporator 
मराठवाडा

माजी नगरसेवकाच्या खुनाचा तपास करताना खुनाची दुसरी घटनाही उघड

प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ : शहरात मध्यरात्री माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांचा खून झाला. या खुनाचा तपास चालू असताना अपहरणाच्या गुन्हाच्या तपास लागला. येथील एका युवकाचे दिड महिन्यांपूर्वी अपहरण झाल्याची घटना घडली होती. या युवकाचा खून करुन परळीतील नवीन थर्मल कॉलनीतील रिकाम्या जागेत पुरल्याचे उघड झाले आहे.

यासंदर्भात येथील संभाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीस दिवसांपूर्वी येथील गौतमनगर भागातील अजय अशोक भोसले या युवकाचे अपहरण झाले म्हणून पूर्णा (जि. परभणी) येथील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण या गुन्ह्याचा अद्याप तपास लागला नव्हता. पण मध्यरात्री माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांचा खून झाल्याने पोलिसांनी आपली तपासाची चक्रे गतीमान केली. या प्रकरणाची चौकशी करत असताना या अजय भोसले याच्या अपहरणाचा तपास लागला. आरोपी बच्चनसिंग शक्तीसिंग बावरी (वय 30) राहणार परळी वैजनाथ याने अजय भोसले या युवकाचे अपहरण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन असलेल्या नवीन थर्मल कॉलनीतील रिकाम्या जागेवर खड्डा करून त्यात या युवकाला पुरले, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीस पकडताच त्याने पुरलेल्या जागेची माहिती दिली. संभाजीनगर पोलीसांनी दिड महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह नायब तहसिलदार श्रीमती वाघमारे, तलाठी श्री. राजुरे, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, पठाण, माने यांच्या उपस्थितीत हा मृतदेह बाहेर काढला यावेळी येथील उपजिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय टीमही उपस्थित होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.



Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT