मराठवाडा

Haribhau Bagde: अनुराधा चव्हाणांनी बांधली बागडेंना राखी, आमदारकीची ओवाळणी मिळणार का?

Fulambri: बागडे नाना अनुराधा चव्हाण यांना आमदारकीचे गिफ्ट देणार का..? अशी चर्चा मतदारसंघात जोरदार रंगली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवनाथ इधाटे

फुलंब्री विधानसभेत नानांचा आशीर्वाद असल्याशिवाय उमेदवारी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक जण बागडे नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी आगळी वेगळी शकल लढत आहे. रक्षाबंधन हे भाऊ बहिणीचं अतूट नात्याच प्रेम व्यक्त करण्याचा सण आहे.

त्यामुळे फुलंब्री विधानसभेतून भाजपकडून इच्छुक असलेल्या अनुराधा चव्हाण यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना राखी बांधून बहिणीचे कर्तव्य निभावलं. त्यामुळे ओवाळणी म्हणून बागडे नाना अनुराधा चव्हाण यांना आमदारकीचे गिफ्ट देणार का..? अशी चर्चा मतदारसंघात जोरदार रंगली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाकडून इच्छुकांची मोठी फौज तयार झालेली आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपकडून तिकीट घ्यायचं तर त्यांना नानाचा आशीर्वाद मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाल्यानंतर प्रथमच संभाजीनगर येथे आल्याने सर्वस इच्छुक उमेदवार आणि जंगी सत्काराचे नियोजन बागडे यांचे केले.

तसेच रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच अतूट नातं असतं. त्याच धर्तीवर अनुराधा चव्हाण यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना राखी बांधून बहिणीचं कर्तव्य निभावलं. त्यामुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे अनुराधा चव्हाण यांना ओवाळणी म्हणून आमदारकीच गिफ्ट देऊन भावाची जबाबदारी पार पाडणार का याबाबत मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हरिभाऊ बागडे नाना यांनी आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाची ओळख आहे.

हरिभाऊ बागडे यांची राज्यपाल पदी वर्णे लागल्याने मतदार संघ दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसाठी मोकळा झाला आहे. त्याचबरोबर हरिभाऊ बागडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले डॉ.कल्याण काळे हे देखील खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना नवख्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे.

रक्षाबंधनच्या सणानिमित्त हरिभाऊ बागडे यांना अनुराधा चव्हाण यांनी राखी बांधून बहिणीचे कर्तव्य निभावले असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे आता ओवाळणी म्हणून हरिभाऊ बागडे नाना अनुराधा चव्हाण यांना आमदारकीचा आशीर्वाद देणार का..? याबाबत मतदार संघात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT