file photo 
मराठवाडा

हिंगोलीत ४६५ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती 

राजेश दारव्हेकर

हिंगोली - जिल्ह्यातील ता. १८ ते ता. ३१ ऑगस्टअखेर मुदत संपलेल्या ४६५ ग्रामपंचायतीच्या प्रशासकांच्या नियुक्त्याचे आदेश सोमवारी (ता. १७) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी काढले आहेत. त्यामुळे प्रशासक नियुक्तीचा तिढा सुटला आहे. 

मागील सहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा २०२० मध्ये राज्यातील ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका देखील निवडणूक विभागाने तूर्त रद्द केल्या आहेत. यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढले होते. यामुळे राजकीय पक्षांचा कार्यकर्त्यांचा भरणा होईल या भीतीपोटी काहींनी आक्षेप नोंदविला होता, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली. तर काहींनी राजकीय पक्षाचे नेते न घेता यावर शासकीय सेवेतील व्यक्तीलाच प्राधान्य द्या, असा काहीसा सूर होता.

प्रशासक नियुक्तीचे अधिकार सीईओंना
राज्य शासनाने ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविले होते. त्यानुसार श्री. शर्मा यांनी सोमवारी (ता. १७) जिल्ह्यातील ४६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यकाळ संपल्याने सर्व ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच, सदस्य आदींचे काहीच चालणार नाही. केवळ प्रशासक हेच पुढील निवडणूक होईपर्यंत कामकाज पाहणार आहेत. 

निवडणुका होईपर्यंत प्रशासक पाहणार काम 
हिंगोली तालुक्यातील ८० ग्रामपंचायती बरखास्त केल्या असल्याने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केला आहे. यामध्ये बळसोंड ग्रामपंचायत येथे प्रशासक म्हणून हिंगोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे ,अंभेरी येथे विस्तार अधिकारी तुप्पड, कारवाडी मधुकर राऊत, इसापुर येथे कनिष्ठ अभियंता बी. पी. लहाने, पिंपरखेड येथे बासंबा येथील केंद्र प्रमुख भुजंगळे यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली तालुक्यातील ८० ग्रामपंचायत प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात ४६५ ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यापासून व नियुक्ती केलेल्या तारखेपासून प्रशासक काम पाहणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासक काम पाहणार असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सांगितले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT