औरंगाबाद - उस्मानपूरा येथे शूक्रवारी चोरांनी फोडलेल्या एटीएम मशीनची पाहणी करताना उपनिरीक्षक अनील वाघ, सहायक फौजदार कल्याण शेळके.
औरंगाबाद - उस्मानपूरा येथे शूक्रवारी चोरांनी फोडलेल्या एटीएम मशीनची पाहणी करताना उपनिरीक्षक अनील वाघ, सहायक फौजदार कल्याण शेळके. 
मराठवाडा

सायरनमुळे वाचले पावणेतीन लाख

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - उस्मानपुरा येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला; मात्र सायरन वाजून बॅंकेला संदेश गेला. दरम्यान, नागरिकांनीही पोलिसांना फोन केले. त्यामुळे पकडले जाऊ, या भीतीने चोर पळाले. दक्ष नागरिक, सुनियोजित यंत्रणेमुळे एटीएम मशिनमधील दोन लाख 72 हजार रुपये वाचले. हा प्रकार शुक्रवारी (ता. 13) सकाळी सातच्या सुमारास घडला.

उस्मानपुरा येथे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमध्ये सकाळी सातच्या सुमारास दोन चोर घुसले. निर्जन रस्ता व परिसर पाहून एकाने टॉमी एटीएम मशीनवर घातली. दणादण वार केल्याने एटीएम मशीनचे बाहेरचे लॉक तुटले; पण लगेचच सायरन वाजला. तरीही चोरांचा एटीएम फोडण्याचा सपाटा सुरूच होता. दरम्यान, एटीएम मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा संदेश मुंबई शाखेतील बॅंक अधिकाऱ्यांना पोचला.

त्यांनीही लगेचच उस्मानपुरा पोलिस व शहरातील बॅंकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली. आवाज झाल्याने नागरिकही गोळा झाले. पोलिस नियंत्रण कक्षाशी तसेच उस्मानपुरा पोलिसांना पटापट संपर्क साधला गेला. यादरम्यान चोर पसार झाले. दक्ष व डिजिटल सुरक्षा यंत्रणेमुळे बॅंकेचे दोन लाख 72 हजार नऊशे रुपये वाचले.

सायरन वाजत असताना एटीएम मशिनमधून कोण आहात, नाव काय, मोबाईल क्रमांक सांगा, अशी विचारणा झाली. तशी यंत्रणाच बसविण्यात आली असून, दक्ष नागरिक, चोख यंत्रणेमुळे मोठी चोरी टळली. येथील सीसीटीव्हीत संशयित दोघे कैद झाले आहेत. बॅंकेकडील फुटेजचा संशयितांच्या शोधासाठी आधार घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT