विद्यापीठ गेट
विद्यापीठ गेट 
मराठवाडा

BAMU : पीजीसाठी नऊ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नऊ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशपूर्व
परीक्षा (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित विभागाला अर्ज, कागदपत्रे दाखल केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. 

विद्यापीठाचा मुख्य परिसर आणि उस्मानाबाद उपपरिसरातील पीजीसाठी गेल्या महिन्यात सीईटी घेण्यात आली. पदवी अभ्यासक्रमाचे निकाल लावण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया लांबली होती; तसेच तीन टप्पे होऊनही काही विभागांत जागा रिक्त राहिल्या होत्या. यासंदर्भात मुदत वाढविण्याची मागणी काही विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांनी केली होती. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. नव्या बदलानुसार नऊ ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. तर, विभाप्रमुखांना 10 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील फॉर्म व कागदपत्रांसह संबंधित विभागात संपर्क साधण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. साधना
पांडे यांनी केले आहे. 
 

वाढीव जागा मागूच नयेत 
पीजी, एमफिल अभ्यासक्रमाच्या रिक्‍त जागावर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्यानंतर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून रिक्‍त जागावर आरक्षणानुसार प्रवेश द्यावा. क्षमतेपेक्षा जास्त जागेवर प्रवेश देऊ नये. वाढीव जागा, कोटा यासाठी विनंतीही करू नये. रिक्‍त जागा भरण्यासाठी विभागप्रमुख, विभागीय समिती यांनी प्रयत्न करावेत. संबंधितांनी कार्यवाहीचा अहवाल 10 ऑगस्टपर्यंत पीजी विभागाचे उपकुलसचिव यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT