crime news. 
मराठवाडा

औंढ्यात पंचायत समिती सदस्य पोलिसांच्या जाळ्यात, काय आहे कारण?

दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (हिंगोली) : येथील पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत झन्ना मन्ना जुगार खेळत होते. त्यावेळी पंचायत समिती सदस्यासह १२ जण पोलीसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यावेळी पोलिसांनी रोख रक्कमेसह दोन लाख ८५ हजार ७२५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ पंचायत समिती येथील सभापती यांच्या निवासस्थानाच्या मागे मोकळी जागा आहे. या जागेत झाडाखाली सोमवारी सायंकाळी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यानी तातडीने घटनास्थळी पथक पाठवले. दरम्यान तेथे काहीजण झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून या झन्ना मन्ना जुगारावर छापा टाकला.  

हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना उत आला असून, अनेकांचे संसार त्यामध्ये उद्धवस्त होत आहेत. अवैध दारू विक्रीसोबतच विविधप्रकारचे मटके, जुगार खेळवले जात आहेत. लॉकडाउन असल्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे पैशाच्या आशेने अनेक लोक अशा जुगाराकडे आकर्षित होताना दिसत आहे. मात्र, या अवैध धंद्यांकडे हिंगोली पोलिसांचे पाहिजे तेवढे लक्ष नसल्यामुळे मटके, जुगार खेळविणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. कुठेही मोकळ्या जागेमध्ये हे जुगार खेळवले जात असल्याने मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

या छाप्यामध्ये  ५१ हजार ७२५ रूपये रोख, ५४ हजार रुपये किमंतीचे आठ मोबाईल, एक लाख ८० हजार रुपये किमंतीच्या चार मोटारसायकल, बावन्न पत्ते असा दोन लाख ८५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून पंचायत समिती सदस्य बालाजी बोडखे,  राजेश चव्हाण (रा. जवळा बाजार), भगवान कदम (रा. तपोवन), पंडित लोणसने (रा. पोटा बुद्रुक), गजानन नागरे (रा. आसोला), भीमराव कर्हाळे (रा. धारखेडा), निवृत्ती कदम (रा. तपोवन), मुंजाजी टोम्पे (रा. सुरवाडी), विजय वाघमारे (रा. जवळा बाजार), राजेश्वर घगारकर (रा. अनखळी), तुकाराम गायकवाड (रा. उखळी), विशाल घोंगडे (रा. पोटा बुद्रुक) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून अकरा जणांना अटक केली आहे. त्यातील विशाल घोंगडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT