court decision
court decision esakal
मराठवाडा

Umarga Crime : औराद येथील खून प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

अविनाश काळे

उमरगा - तालुक्यातील औराद (गुंजोटी) येथे शेतीच्या वाटणीवरुन पुतण्याने चुलत्याचा खुन केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (ता. ३०) सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० मे २०२० रोजी झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

या बाबतची माहिती अशी की, औराद येथील दिगंबर गणपती दुधभाते यांचा मुलगा शिवकांत व पवन दिलीप दुधभाते हे २० मे २०२० रोजी सकाळी अकराच्या दरम्यान गाव शिवारात शेळ्या चारत फिरत होते. त्या वेळी पवनला त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तींचा फोन आला. तो व्यक्ती दिगंबर दुधभाते कोठे आहे, याची चौकशी करत होता.

सांयकाळी सहाच्या सुमारास दिंगबर, त्याचा मुलगा शिवकांत व अन्य लोक मधूकर पवार याच्या शेताजवळ होते, त्या वेळी समोरच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्रमांक एम एच १२ जी झेड २८२१) दिंगबरचा पुतण्या अक्षय शेषेराव दुधभाते रा. औराद, मुकेश कांबळे, रा. औराद आले.

या वेळी अक्षय हा चुलता दिगंबर यास म्हणाला की, तु माझे बापाला का बरं मारलास, तुला घरात व शेतात कसलीच वाटणी मिळू देणार नाही असे म्हणत अक्षय व मुकेश यांच्यासह अनोळखी इतर चार व्यक्तींनी दिगंबर यास वेळूच्या काठ्याने जबर मारहाण केली.

त्यावेळी दिगंबरचा मुलगा शिवकांत व पवन मारु नका असे म्हणून ओरडत होते, त्यावेळी गावातील सुशांत कारभारी, संतोष गायकवाड, शिवाजी पवार यांनी मारहाणीचे प्रकरण सोडवत असताना आरोपींनी त्यांनाही वेळूच्या काठीने मारले. त्यानंतर तेथून आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या दिंगबरचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिंगबरची पत्नी दैवता यांच्या तक्रारीवरुन २१ मे रोजी गुन्हा दाखल झाला.

तत्कालिन पोलिस उप निरिक्षक अमोल मालूसरे यांनी चौकशी करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात बचाव पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले तर सरकार पक्षातर्फे एकूण २५ साक्षीदारातील डॉ. मल्लिकार्जन खिचडे, विजय दुधभाते, श्रीनिवास पवार, यशवंत पवार, प्रत्यक्षदर्शी शिवाजी गायकवाड, पवन दुधभाते, शिवकांत दुधभाते, विक्रांत कांबळे, फिर्यादी दैवता दुधभाते, अतूल जाधव, डॉ. धर्मराज दुड्डे, आयबाइक संतोष बोयने, शरद मारेकर, गुरुनाथ वाकोडे व तत्कालिन तपासणी अधिकारी अमोल मालूसरे यांची महत्वपूर्ण साक्ष दिली.

साक्षीदारांनी दिलेला जबाब व सहाय्यक शासकिय अभियोक्ता अँड. संदिप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन उमरगा येथील सत्र न्यायाधिश डी. के अनुभूले यांनी अक्षय दुधभाते, मुकेश कांबळे रा. औराद, वैभव शेलार, निनाद महाडिक, श्री मंगेश चौधरी, सागर ढोकणे रा. सर्वजण कर्वेनगर पुणे या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त !

या प्रकरणाचे गांभिर्य पाहता जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. निकालानंतर पोलिस यंत्रणा न्यायालय परिसरात लक्ष ठेऊन होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT