मराठवाडा

आजपासून रात्रीही अतिक्रमण हटाव

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेतर्फे शहरात आता रात्रीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठेतील चौकांमध्ये रात्रीच्या वेळी हातगाड्या, पानटपऱ्यांचा विळखा पडत असल्याने नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. वाढत्या तक्रारींमुळे शनिवारपासून (ता. १६) सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 

शहरातील पैठण गेट ते सिटी चौक, शहगंज ते सिटी चौक, शहागंज चमन, क्रांती चौक, क्रांती चौक ते रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, टीव्ही सेंटर, सिडको बसस्थानक, हर्सूल टी पॉइंट, मुकुंदवाडी, चिकलठाणा, शहानूरमियाँ दर्गा, शिवाजीनगर, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर, कामगार चौक ते सिडको बसस्थानक यांसह इतर रस्त्यांवर रात्रीच्या वेळी हातगाडीचालकांचा धुमाकूळ सुरू असतो. या वेळेतच रस्त्यांवर वाहनांची संख्या जास्त असते. त्यात हातगाडीचालक अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता ताब्यात घेतात. त्यात अनेक चौकांमध्ये अतिक्रमणे करून टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. अशा अस्थायी अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पथक तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार शनिवारपासून शहरात कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. सुरवातीला महापालिका व पोलिसांतर्फे अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात येईल, त्यानंतर जप्तीसारख्या कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हॉकर्स झोनचे धोरण करणार निश्‍चित 
महापालिकेचे हॉकर्स झोनचे धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. गेल्या काही वर्षांपासून याबाबत कागदोपत्री खेळ सुरू आहे. शनिवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत हॉकर्स झोन निश्‍चित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. काही टपऱ्या महापालिकेच्या जागांवर थाटण्यात आल्या आहेत. त्याचेही धोरण ठरवावे लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT