औरंगाबाद - याच पिंजऱ्यात वन्य प्राण्यांची घुसमट सुरू आहे.
औरंगाबाद - याच पिंजऱ्यात वन्य प्राण्यांची घुसमट सुरू आहे. 
मराठवाडा

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय परवानगीविनाच

माधव इतबारे

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात साखळदंडात बांधून ठेवलेल्या हत्तींची रविवारी (ता. दहा) महापालिकेने सुटका केली. असे असताना कोल्हे, लांडग्यांसह इतर वन्य जीवांची अपुऱ्या जागेत घुसमट सुरूच आहे. नॅशनल झू ॲथॉरिटीच्या निकषांनुसार या प्राण्यांना सध्याची जागा अपुरी असल्याने महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तीस कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लान तयार केला; मात्र प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात होणाऱ्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ‘मास्टर प्लान’कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, तर दुसरीकडे सफारी पार्कच्या जागेला अद्याप एक वीटसुद्धा लागलेली नाही. या गोंधळात प्राणिसंग्रहालय दोन वर्षांपासून विना परवानगीच सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, बिबटे या हिंस्र प्राण्यांसह हत्ती, अस्वल, कोल्हे लांडगे, नीलगाय, हरिण असे दीडशेहून अधिक प्राणी होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस प्राण्यांच्या संख्येत घट होत आहे. अपुरी जागा, खिळखिळे झालेले पिंजरे यामुळे प्राणिसंग्रहालयच धोक्‍यात आले आहे. प्राणिसंग्रहालयासाठी महापालिकेला नॅशनल झू ॲथॉरिटीकडून परवाना नूतनीकरण करून घ्यावा लागतो. त्यावेळी संग्रहालयातील अपुऱ्या सुविधांची जंत्रीच महापालिका प्रशासनापुढे ठेवली जाते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे नॅशनल झू ॲथॉरिटीकडे परवाना नूतनीकरणासाठी फाइल पाठविताना महापालिका अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यात येत असून, त्यासाठी ३० कोटी रुपयांचा मास्टर प्लान तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला होता. नॅशनल झू ॲथॉरिटीने त्याला मंजुरीही दिली; मात्र मास्टर प्लान अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, महापालिकेला मिटमिटा परिसरात शासनाने शंभर एकर जागा दिली. त्यामुळे प्राणिसंग्रहालय या जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून मास्टर प्लान धूळखात पडून आहे, तर दुसरीकडे सफारी पार्कच्या जागेला एक वीटही लागलेली नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वन्य जिवांची घुसमट सुरू आहे. 

वाहतूक उद्यानाने अडविली जागा 
वाहतूक उद्यानाने प्राणिसंग्रहालयाची जागा अडविली आहे. सहा एकर जागेत हे उद्यान असल्याने प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करताना अडचणी येत आहेत. वाहतूक उद्यानाचे नूतनीकरण करतानाच विरोध करण्यात आला होता; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  
 

काय सांगतो नियम? 
रविवारी महापालिकेच्या साखळदंडातून हत्ती सुटले; मात्र कोल्हे, लांडगे, तरस यासह इतर प्राण्यांची अपुऱ्या जागांमध्ये घुसमट सुरू आहे. एका प्राण्याला नियमानुसार चारशे स्क्वेअर फूट जागा लागते; मात्र सध्या हे प्राणी एका पिंजऱ्यात केवळ दहा बाय पंधरा फूट आकाराच्या जागेत डांबण्यात आले आहेत. तातडीने महापालिकेने यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर परवाना कायमस्वरूपी निलंबित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

झेब्रा, जिराफची शक्‍यता धूसर 
हत्ती गेल्यामुळे त्यांची कसर भरून काढण्यासाठी जिराफ, झेब्रा आणण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे; मात्र हा प्रस्ताव नॅशनल झू ॲथॉरिटीने फेटाळून लावला आहे. सध्या असलेल्या प्राण्यांचे हाल थांबवा, त्यानंतरच पुढचा विचार करा, असा सल्ला अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT