संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा पाऊणशे कोटीचा गल्ला

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद - रेल्वेकडून सातत्याने सापत्न वागणूक मिळणाऱ्या औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या टॉप ट्‌वेंटीत आपले स्थान निश्‍चित केले आहे. वर्षभरात 73 कोटी, तर गेल्या चार महिन्यांत 25 कोटी रुपयांची कमाई औरंगाबाद रेल्वेस्थानकाने केली आहे. क्षुल्लक कमाई करणाऱ्या रेल्वेस्थानकांना भरभरून निधी देणाऱ्या दक्षिण-मध्य रेल्वेने आतातरी डोळे उघडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दक्षिण-मध्य रेल्वेच्या औरंगाबाद रेल्वेस्थानकाने वर्ष 2018-19 मध्ये तब्बल 73.14 कोटी रुपयांचे उत्पन्न दिले आहे; तर वर्ष 2019-20 म्हणजे मार्च ते जुलै या चार महिन्यांत 25 कोटी 34 लाख रुपयांचा गल्ला मिळवून दिला आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानक उत्पन्नात आठव्या स्थानकावर आहे. मराठवाड्यात नांदेडने 118.96 कोटींचे उत्पन्न मिळवले. औरंगाबादने 73.14 कोटींचे उत्पन्न मिळवून द्वितीय स्थान पटकावले आहे. भरभरून उत्पन्न मिळत असतानाही औरंगाबाद स्थानकाकडून कमी उत्पन्न असल्याचा कांगावा नेहमीच दक्षिण-मध्य रेल्वेचे अधिकारी करतात. 

दक्षिण-मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर सातत्याने दुजाभाव केला जात आहे. मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद हे विभागात क्रमांक दोनचे शहर आहे. तरीही दक्षिण-मध्य रेल्वेकडून सातत्याने अन्यायाची भूमिका कायम आहे. काही ना काही कारण देऊन औरंगाबादला दुर्लक्षित ठेवण्यात दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धन्यता वाटते. भंगार इंजिन, भंगार डबे औरंगाबादसाठी दिले जातात. चिकलठाणा येथे पीटलाइन करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे. गर्दीच्या सिझनमध्ये सातत्याने मागणी करूनही एकाही रेल्वेला डबा जोडण्यात येत नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या दिल्या जात नाहीत. नवीन रेल्वे सुरू केल्या जात नाहीत. सोयीसुविधा आणि निधी देण्याची वेळ आल्यानंतर औरंगाबाद रेल्वेस्थानकातून उत्पन्न मिळत नसल्याची टिमकी वाजवण्यात अधिकाऱ्यांना धन्यता वाटते. 

सचखंड, देवगिरीही अव्वल 
टॉप ट्‌वेंटी रेल्वेमध्ये नांदेड-अमृतसर सचखंड एक्‍स्प्रेसने 53.65 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्‍स्प्रेसने 27.68 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून सतराव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. 

अशी आहे परिस्थिती (वर्ष 2018-19) आकडे कोटीत
सिकंदराबाद जंक्‍शन स्टेशन 869.18 
विजयवाडा 331.72 
तिरुपती 299.65 
हैदराबाद 173.56 
काचीगुडा 164.65 
नांदेड 118.96 
राजामुंद्री 107.90 
औरंगाबाद 73.14 
नेल्लोर 67.26 
गुंटूर जंक्‍शन 64.82 
वरंगल 59.20 
रेणीगुंटा 58.87 
सामलकोट जंक्‍शन 48.27 
लिंगमपल्ली 47.18 
काझीपेठ जंक्‍शन 43.79 
ओंगले 43.12 
खम्मम 36.81 
काकीनाडा टाऊन 35.91 
निजामाबाद 35.53 
परभणी 33.32 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT