Aurangabad esakal
मराठवाडा

Aurangabad : पाणीटंचाई विरोधात भोकरदन नगरपालिकेवर काँग्रेसच्या वतीने महिलांचा धडक हंडा मोर्च

पाणी पुरवठ्यासह नागरी सुविधा पुरविण्यात मुख्याधिकारी आणि प्रशासक पूर्णपणे अपयशी ठरले आहे

तुषार पाटील

भोकरदन : शहरातील तीव्र पाणीटंचाई व विविध समस्या बाबतीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १८ डिसेंबर सोमवारी सकाळी १२वाजता भोकरदन नगर पालिकेवर धडक हंडा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चा शहरातील सर्वच भागातील महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

भोकरदन नगर पालिकेवर मागील दोन वर्षांपासून प्रशासक आल्यानंतर नगरपरिषदचा कारभार विस्कळीत झाला असून प्रशासक आणि मुख्याधिकारी यांचे पालिके मधील कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणी पुरवठ्यासह नागरी सुविधा पुरविण्यात मुख्याधिकारी आणि प्रशासक पूर्णपणे अपयशी ठरले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

भोकरदन शहरातील काही भागात 15 दिवस काही भागात 25 दिवस तर काही भागात महिनाभरानंतर पाणी येते यावर महिलांनी नगरपरिषदे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ,पाणी नाही तर पाणीपट्टी देखील भरणार नाही असा एक सूर महिलांनी यावेळी काढला शहरातील सर्वच भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असारा इशारा यावेळी महिलांनी दिला, मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांना निवेदन देण्यात आले नगरपरिषदेच्या इमारती समोर महिलांनी यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त केला. पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी यावेळी दिले.

या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, तालुकाध्यक्ष त्रंबक पाबळे ,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वंदना हजारे अंजना साहेबराव बारोकर ,भाऊसाहेब सोळुंके, माजी नगरसेविका गयाबाई रमेश जाधव ,एजाज पठाण ,अनिल पगारे ,अर्जुन कुराडे ,सोपान सपकाळ, पंजाबराव देशमुख ,रोशन देशमुख,प्रल्हाद लहूरकर यांच्यासह शेकडो महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT