file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

COVID-19 : औरंगाबादेत आज वाढले २२ रुग्ण, कांचनवाडी, एन-८, एन-११, जुना मोंढासह या भागात नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत चार दिवसांत अनुक्रमे 32 व 30,  37  व 20 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी ( ता.  26) 22 रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  जिल्ह्यात आता  कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 327 झाली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्ण
जुना मोंढा (1),  बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको (1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमाननगर (1), हनुमान चौक (1), न्यायनगर (1), कैलाशनगर (1), रामनगर (1), एन-8 सिडको (4), रोशन गेट (1), एन-11 सुभाषचंद्रनगर (1), पुंडलिकनगर (1), भवानीनगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटीतून 13 जण, केअर सेंटरमधून 89 जण बरे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गोगा बाबा मंदिर, उस्मानपुरा, गांधीनगर, हिमायतनगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, अक्सा मस्जिद, बारी कॉलनी, शहा बाजार, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील आहेत. तसेच महापालिकेच्या कोविड केअर केंद्रातून सोमवारी (ता. 25) एकूण 89 कोरोनाबाधितांना ते बरे झाल्याने सुटी देण्यात आली. सोमवारी 102 जण बरे झाले असून, एकूण 721 जण बरे झाले आहेत.

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण            - 721
उपचार घेणारे रुग्ण        - 551
एकूण मृत्यू                   - 55
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -  1327

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT