41 year person came to meet friends end his life crime police Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : भेटण्यासाठी आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने मैत्रिणीच्या घरातच संपवले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट

Waluj Latest News : वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : मैत्रिणीच्या घरी भेटण्यासाठी आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत जीवन संपविले. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली आहे. श्रीराम झुलन कुशवाह भगत (वय ४१, रा. बजाजनगर) असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

श्रीराम हे मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. काही वर्षांपासून ते येथे एका कंपनीत कामाला होते. पत्नी व मुलांसह ते बजाजनगरात वास्तव्यास होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला श्रीराम यांनी कारखान्यात कामाला लावून देतो, असे सांगितले. त्यावर संबंधित महिला नऊ महिन्यांपूर्वी तिच्या चार मुलांसह वाळूजला आली.

तिला एका कारखान्यात कामाला लावून देत रांजणगावात भाड्याने घर घेऊन दिले. संबंधित महिलेला श्रीराम रोज कंपनीतून घरी सोडत होता. दरम्यान, श्रीराम हा गुरुवारी तिच्या घरी गेला. त्यात त्यांच्यात वाद झाला. मध्यरात्री सुमारास महिलेस जाग आली.

त्यावर श्रीराम यांनी गळफास घेतल्याचे दिसले. याप्रकरणी वाळूज औद्योगिक वसाहत परिसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक अशोक इंगोले अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT