Loksabha Election
Loksabha Election  sakal
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election : आचारसंहितेत अडकली ७०० कोटींची कामे ; निवडणुकीनंतरच प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेपूर्वी शहरातील विकास कामांच्या निविदा मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने महिनाभर जोरकसपणे प्रयत्न केले पण, केवळ ७० ते ८० कोटींच्या कामांच्या निविदा मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल ७०० कोटी रुपयांच्या निविदा आता आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यात पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघातील ड्रेनेज लाईनच्या कामाच्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या निविदांचा तर इतर १०० कोटींच्या कामांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने विकास कामांच्या निविदांच्या अटीमध्ये बदल केले होते. त्यामुळे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण व्हावी, असा शासनाचा हेतू होता. त्यानुसार महापालिकेने गेल्या महिनाभरात विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केली.

राज्य शासनाने शहर सेप्टिक टॅंकमुक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी २०६ कोटी, पश्चिमसाठी १९६ कोटी व मध्यसाठी १९० कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यासोबतच कचरा प्रक्रिया केंद्रावर पडून असलेल्या दहा लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी ६६ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या कामासोबतच महापालिकेने इतर कामांच्या अशा सुमारे ६८० कोटींच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यातील केवळ ७० ते ८० कोटींच्या निविदा महापालिकेला अंतिम करता आल्या. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर या निविदा प्रक्रिया मार्गी लागण्‍याची शक्यता आहे.

प्रक्रिया राहणार सुरू

आचारसंहिता लागण्यापूर्वी या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निविदा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहील, पण निविदा अंतिम केल्या जाणार नाहीत. इच्छुक कंत्राटदारांसोबत प्रि-बीड बैठक घेऊन त्यांनी सुचविलेल्या सूचनांचा समावेश करणे, निविदा स्वीकारून तांत्रिक बिड उघडणे, या प्रक्रिया करता येतील पण आर्थिक बीड आणि निविदा अंतिम करण्याचे काम मात्र आचारसंहिता संपल्यानंतरच करावे लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलील ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT