पैठण (जि.औरंगाबाद) : नाथसागराचे दुसऱ्यांदा २७ दरवाजे उघडण्यात  आले आहे.
पैठण (जि.औरंगाबाद) : नाथसागराचे दुसऱ्यांदा २७ दरवाजे उघडण्यात आले आहे.  Gates Of Jayakwadi Dam Of Aurangabad Again Opens
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणाचे पुन्हा दरवाजे उघडले,पाणीपातळीत वाढ

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाचे (Jayakwadi Dam) शुक्रवारी (ता.एक) रात्री धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा दुसर्‍यांदा आपत्तीकालिन दरवाजे उघडावे लागले आहे. त्यामुळे धरणाचे एकुण २७ दरवाजातुन गोदावरीत ८० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असुन आवक ९० हजार क्युसेक आहे. रात्री पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली (Paithan) शाखा अभियंता बी. वाय अंधारे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांनी युध्दपातळीवर दरवाजे उघडण्याची प्रक्रिया मुसळधार पावसात पार पाडली. धरणातील वाढत्या पाणीपातळीमुळे गोदाकाठच्या (Godavari River) गावांना सतर्कचे इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे. अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात (Aurangabad) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरण प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून धरणातुन गोदापात्रात पाणी सोडणे सुरु ठेवले.

पहिल्या दिवशी पाणी सोडण्यात आल्यानंतर याच दिवशी रात्री अकरा वाजता धरण प्रशासनाने धरणात एक लाख क्यूसेक पाण्याचा ओघ सुरू झाल्यामुळे आपत्तीकालिन दरवाजे उघडुन एकुण २७ दरवाजे उघडुन पाणी सोडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्याची आवक कमी होताच २७ पैकी ९ आपत्कालीन दरवाजे बंद करुन १८ दरवाजातुन पाणी सोडण्यात सोडणे सुरु ठेवले होते. आता पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत मोठी वाढ होत असल्याने एकुण २७ दरवाजातुन पाणी सोडले जात आहे.

पैठण शहराला अद्याप पुराचा धोका नाही - नगराध्यक्ष सुरज लोळगे

दरम्यान, नाथसागरातुन गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे शहरालगत असलेल्या गोदापात्रातुन प्रचंड पाणी वाहून जात आहे. गोदापात्राजवळील परिस्थितीची नगर पालिका प्रशासनाने पाहणी केली असुन तेथील पाणी परिस्थितीवर कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी दिली. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली असून धरणाच्या वाढत्या पाणीपातळीमुळे अद्याप तरी पैठण शहराला पुराचा धोका नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT