Agrowon agricultural exhibition 2023 young farmers honored agri business
Agrowon agricultural exhibition 2023 young farmers honored agri business sakal
छत्रपती संभाजीनगर

Agrowon agricultural exhibition 2023 : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात ज्ञानाचा जागर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चिकलठाणा ‘एमआयडीसी’मधील ‘कलाग्राम’मध्ये १३ ते १६ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी निविष्ठा, खते- बियाणे, कृषिपूरक उद्योग,

आधुनिक अवजारे पाहण्याची, माहिती घेण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेच; पण त्याचबरोबर प्रयोगशील शेतकरी आणि विविध विषयांतील कृषी तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी दररोज अभ्यासपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय निवडक व तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांचा या चर्चासत्रांमध्ये ‘ॲग्रोवन’च्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’ आहेत. तसेच असोसिएट पार्टनर म्हणून बसवंत गार्डन हे आहेत.

याशिवाय केबी, चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा महाऊर्जा, आत्मा औरंगाबाद हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर इफ्को हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

विश्‍वासराव पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

औरंगाबादमधील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने लोहारा (जि. जळगाव) येथील शाश्‍वत शेतीचे तंत्र विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी कृषिरत्न विश्‍वासराव पाटील यांच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

चर्चासत्रांचे विषय आणि तज्ज्ञ

१३ जानेवारी (शुक्रवार) सकाळचे सत्र

विषय : गटशेतीमधील संधी, केसर आंबा उत्पादनवाढ, विक्री तंत्र

वक्ते : १) डॉ. बी. एम. कापसे, फलोत्पादन तज्ज्ञ

२) तानाजी वाडीकर, प्रयोगशील शेतकरी नागलगाव, जि. लातूर

१४ जानेवारी (शनिवार)

सकाळचे सत्र

विषय : जमीन सुपीकता वाढविणारे शून्य मशागत तंत्र

वक्ते : १) प्रताप चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, कोल्हापूर

२) दीपक जोशी, प्रयोगशील शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

३) अतुल मोहिते, प्रयोगशील शेतकरी, टापरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

दुपारचे सत्र

विषय : कोरडवाहू शेतीची नवी दिशा

वक्ते : १) उदय देवळाणकर, कृषी तज्ज्ञ, औरंगाबाद

१५ जानेवारी (रविवार)

सकाळचे सत्र

विषय : रेशीम उद्योग : गरज आणि संधी

वक्ते : १) दिलीप हाके, उपसंचालक, रेशीम, मराठवाडा विभाग २) अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना ३) भाऊसाहेब निवदे, प्रयोगशील रेशीम उत्पादक, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना ४) संपत करताडे, प्रयोगशील रेशीम उत्पादक, चौंढाळा, जि. औरंगाबाद

दुपारचे सत्र

विषय : मोसंबी, डाळिंब फळबागेतील नवे तंत्र

वक्ते : १) डॉ. संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना

२) विठ्ठल भोसले, प्रयोगशील डाळिंब उत्पादक, करमाड, जि. औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT