छत्रपती संभाजीनगर

पंकजा मुंडेनी पाच वर्षात काय केलं - अजित पवार 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी पाण्याच्या प्रश्‍नासाठी उपोषण केलं मात्र मागील पाच वर्ष राज्यात केंद्रात दोन्ही ठिकाणी त्यांचं सरकार होतं तेव्हा पाण्यासाठी का ? काही केलं नाही. असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा यांच्या लाक्षणिक उपोषणा संदर्भात उपस्थित केला.

पवार म्हणाले की, त्यांच माझ्याकडे कुठलेही निवेदन आलं नाही. त्यांच्या सरकारच्या काळात काम केली असती तर पंकजा ताईंना पोषणाला बसण्याची वेळ आली नसती. पंकजा ताई यांनी उपोषणाला बसण्याअगोदर विचार करायला हवा होता की आपण पाच वर्ष सत्तेत होतो. राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार होते. त्यावेळेस काम केले असते तर आज उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती.

मराठवाड्याची बैठक घेतली 

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांची बैठक घेतली. काही पालकमंत्री आज बैठकीला आले मात्र काहींना शक्‍य झालं नाही. त्यांनी कालच भेट घेऊन माहिती दिली. ऑरीक सिटीबद्दल बरच ऐकलं होतं, त्यामुळे ते पाहिलं. अतिशय उत्तम उदाहरण आहे. इतर शहरांनी ते पाहिलं पाहिजे. मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा असा प्रकल्प आहे. त्याकडे विशेष लक्ष देणार आहोत. मंदीचा काळ आहे मात्र ते उभं झालं की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे असं अजित पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT