Ajit Pawar provisions Budget including health tourism development
Ajit Pawar provisions Budget including health tourism development Sakal
छत्रपती संभाजीनगर

अर्थसंकल्पात मराठवाडा; आरोग्य, पर्यटन विकासासह अनेक तरतुदी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.११) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात मराठवाड्यासाठी काही तरतुदींचा समावेश आहे. जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यासाठी ६० कोटी, जायकवाडी येथे जलपर्यटन, फर्दापूर, अजिंठा, वेरूळ येथे पर्यटन विकासाठी सुविधा, औरंगाबाद येथे १०० खाटांचे स्त्रीरोग रुग्णालय, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळद पिकाच्या संशोधनासाठी शंभर कोटी, नांदेडच्या खादी ग्रामोद्योग केंद्रासाठी २५ कोटी अशा काही तरतुदींचा त्यात समावेश आहे.

  • नांदेडमध्ये प्रत्येकी ५० खाटांचे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारणार, भांडवली, आवर्ती खर्चाची तरतूद.

  • औरंगाबाद, हिंगोलीत येथे प्रत्येक १०० खाटांचा स्त्री रुग्णालय स्थापन करणार

  • बीड येथील स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणीवर्धनाची काम हाती घेतली

  • जालना येथे ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी ६० कोटी देणार

  • कौडगाव व शिंदाळा (जि. लातूर) येथे एकूण ५७७ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प

  • जायकवाडी येथे जलपर्यटन प्रकल्प प्रस्तावित

  • फर्दापूर (जि. औरंगाबाद), अजिंठा, वेरूळ येथे पर्यटन विकास- सुविधांसाठी अनुदान

  • वसमत (जि. हिंगोली) येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र. या केंद्रात प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन, शंभर कोटींचा निधी देणार

  • मराठवाडा, विदर्भात सोयाबीन- कपाशी पिकांसाठी विशेष कृती योजना, येत्या तीन वर्षांत एक हजार कोटींचा निधी

  • उस्मानाबाद या आकांक्षित जिल्ह्यात वाशीम जिल्ह्याच्या धर्तीवर पाझर तलावांचे साठवण तलावात रूपांतर करून जलसिंचन सुविधा पुनर्जीवित करण्याची योजना

  • देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक एक अशी एकूण तीन मोबाइल प्रयोगशाळा स्थापन करणार.

  • औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दहा कोटी रुपये

  • समृद्धी महामार्गाचे काम ७७ टक्के झाले असून जालना - नांदेड द्रुतगती जोड महामार्गाच्या भूसंपादनासाठी निधी देणार

  • नगर- बीड -परळी वैजनाथ रेल्वे मार्गाची कामे विविध टप्प्यात असून जालना-जळगाव या नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य शासनाकडून आर्थिक सहभागाचा प्रस्ताव विचाराधीन.

  • मुंबई-जालना-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबतच केंद्राकडे पाठपुरावा करणार

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथील खादी ग्रामोद्योग केंद्राच्या इमारतीची पुनर्बांधणी, विक्री केंद्र उभारणीसाठी २५ कोटी रुपये निधी देणार

  • हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे अमृतमहोत्सवी वंदे मातरम सभागृहाचे काम पूर्ण करणार, ४३ कोटींचा निधी देणार

  • १७ सप्टेंबर २०२२ ला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होणार आहे. यासाठी विविध कार्यक्रम होतील. त्याची रूपरेषा निश्चितीसाठी मराठवाड्यातील सर्व मंत्री, पालकमंत्र्यांसमावेश असलेली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार, ७५ कोटींचा निधी देणार.

रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश केल्याने शेतकऱ्यांना लाभ होईल. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची महत्त्वाची घोषणा झाली आहे. महिला शेतकऱ्यासाठी कृषी योजनांत ५० टक्के तरतूद आहे. शेततळ्यासाठी अनुदानात मोठी वाढ आहे. अन्य क्षेत्रांतही भरीव तरतुदी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.

- संदीपान भुमरे, रोहयो, फलोत्पादन मंत्री

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेती, सिंचन आणि शिक्षण क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डिझेल, पेट्रोलवरील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रासह इतर काही राज्यांनी कर कमी केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केलेला नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी दोन वर्षांपूर्वी घोषित केली होता. तो देण्यासाठी आता तरतूद केली आहे. जालन्यासह मराठवाड्यातील विविध प्रलंबित कामांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही.

-रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT