Ambadas Danve question to Devendra Fadnavis over airport renaming  Sakal
छत्रपती संभाजीनगर

विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही; अंबादास दानवे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

भाजपची मंगळवारी (ता. पाच) शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराचे नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याचा दावा करता, मग विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. सहा) केला आहे. 

भाजपची मंगळवारी (ता. पाच) शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी 'आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय घेतला आणि त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

त्यावर दानवे यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी ? मग २०१४ ते २०१९ सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही ? 

शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती, त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे. ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमचा त्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली होती! 

लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा, असा प्रश्न दानवे यांनी फडणवीस यांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT