bus sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : चाळीस वर्षांपासून सुरू असलेली बस बंद

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी

राजेश नागरे, सकाळ वृत्तसेवा

पाचोड : गत चाळीस वर्षांपासून सुरु असलेली पैठण-सोलापूर बस दोन वर्षांपासून पैठण आगाराने अचानक बंद केल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळत आहे.

गेल्या चाळीस वर्षापासून पैठण आगारातून तुळजापूर-सोलापूर ही बस सुरु होती. सकाळी साडेसहा वाजता पैठण आगारातून ही बस पाचोडमार्गे जात होता. या मार्गावरील ही सकाळी धावणारी पहिली तर रात्री पैठणला परत येणारी शेवटची बस होती. पैठण-पाचोड रस्त्यावरील लिंबगाव, थेरगाव, हर्षी, दादेगाव, नांदर, दावरवाडी, खेर्डा, नानेगाव, आखतवाडा, सोलनापूर, राहटगाव, करंजखेडा या गावातील शेकडो विद्यार्थी सकाळी आठ वाजता भरणाऱ्या शाळांच्या तासिकांना तर काही जण खासगी शिकवण्यांना हजेरी लावत होते.

तर अनेक जण सकाळीच बाहेरगावी कामानिमित्त जाण्यासाठी या बसनेच प्रवास करीत होते. दिवसभराची कामे उरकून सायंकाळी सव्वानऊ वाजता पाचोड बसस्थानकावर ही बस सोलापूरहून परत पैठणला जाण्यासाठी येत असल्याने नागरिक, प्रवासी येथे प्रतिक्षा करीत पाचोडच्या बसस्थानकावर जमा होत. रात्रीला पैठणला जाण्यासाठी ही शेवटची बस होती. मात्र, अचानक दोन वर्षापूर्वी पैठण आगाराने ही बस बंद केल्याने नागरिकांसह शाळकरी मुलांचे हाल होत आहे. शेकडो विद्यार्थ्याचे सकाळचे तास बुडून शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे खेड्याकडे चला असा सर्वत्र मंत्र दिला जात आहे, तर दुसरीकडे परिवहन विभाग खेड्यांच्या दळणवळणालाच कात्री लावून ग्रामीण भागातील संबंध तोडून समस्येत भर घालत आहे.

पाचोड, ता.११ (बातमीदार) गत चाळीस वर्षांपासून सुरु असलेली पैठण-सोलापूर बस दोन वर्षांपासून पैठण आगाराने अचानक बंद केल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत असून त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय स्तरावर कोट्यवधी खर्च होत आहे, तर दुसरीकडे दळणवळणाच्या साधना अभावी शिक्षणासाठी मुलांमुलीची परवड होत आहे. वरिष्ठांनी तातडीने ही बस सुरु करावी.अन्यथा पाचोड-पैठण रस्त्यावरील सर्व गावकरी एकत्र येऊन आंदोलन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT