Aurangabad  news
Aurangabad news esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबादेतील आनंद हास्य क्लब देतोय चिंतामुक्त होण्याची शिकवण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : हसणं हा मानवी स्वभाव आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या चेहऱ्यावरचे हास्यच गायब झाले आहे. मानसिक आरोग्य, रक्तदाब कमी करणे, हृदयाच्या आरोग्यासाठी औषधांइतकेच गुणकारी असलेले हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुलावे यासाठी सिडको एन-२ भागातील आनंद हास्य क्लब गेल्या २५ वर्षांपासून काम करीत आहे. दरम्यान, सिडको एन ३, किटली गार्डनमध्ये रोज सकाळी असा हास्य क्लब चालतो. शहरात तीन-चार ठिकाणी असे क्लब असून त्यातील सदस्य स्वतः खळखळून हसत इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव वाढत आहेत. त्यातून मुक्त होण्यासाठी खळखळून हसणे हा उत्तम व्यायाम आहे. योग, ध्यानसाधनेसोबत हास्य योगाचे शरीराला अनेक फायदे असल्याने त्याचे महत्त्व ओळखून सिडको एन-२ येथे योग वर्गासाठी एकत्र येणाऱ्यांनी आनंद हास्य क्लबची १९९७ मध्ये सुरवात केली. आनंदी जीवन जगण्यासाठी गेली २५ वर्षे या क्लबमार्फत शिकवण दिली जात आहे. अभियंता अरुण गायकवाड, श्री. सोनटक्के, दिवंगत कंत्राटदार पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या क्लबच्या माध्यमातून अनेक नागरिक जोडले गेले आहेत. हास्य योग विशेषतः वृद्धांसाठी चांगला मानला जातो. हास्य योग रक्तदाब कमी करताना श्वसन दर वाढवतो. हास्य योगामुळे श्वास खोलपर्यंत घेतला जातो. म्हणून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच हास्य योग नियमितपणे केल्यास नैराश्य कमी येते.

जयकुमार भोईरीकर, डॉ. प्रकाश झांबड, रवींद्र जोशी, के. बी. देशमुख, वामन नंदनवार, गणेश आव्हाड, अप्पासाहेब चाटे, दयानंद भांगे, कैलास जाधव, पी. एल. सोरमारे, ॲड. रेवण भूमकर, सोपान काळुसे, नितीन रुणवाल, अभियंता कल्याण भोसले, श्री. भोवरेकर, विजय वाघमारे, मिलिंद पाटील, गोराडे पाटील, भगवान तेली, विजय कटारिया, अॅड. ज्ञानेश्वर कोरडे, सतीश साकला आदी हास्य क्लबचे सक्रिय सदस्य आहेत.क्लबमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, रोज अर्धा तास हास्याचे विविध प्रकार ते सादर करतात. हास्य योगामुळे त्यांचा उत्साह तरुणांपेक्षा जास्त असतो. हास्य योग शहरातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून प्रत्येकाचे जीवन आनंदी झाले पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे सदस्यांनी सांगितले.

असे आहेत फायदे

- खळखळून हसण्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो

- दिवसाची सुरवात प्रसन्न होते

- दिवसभर ताणतणावn जाणवत नाही

- एकाग्रता वाढते

- काही व्याधी कमी करण्यासाठी मदत

प्रत्येक रविवारी ट्रेकिंग

आठवड्याचे सहा दिवस हास्य योग केल्यानंतर प्रत्येक रविवारी आनंद हास्य क्लबचे सदस्य शहर परिसरातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी जातात. मनाच्या प्रसन्नतेसोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष दिले जाते. तसेच प्रत्येक दिवसी एक सदस्य विनोद सांगत असतो.

हास्याचे प्रकार

स्वागत हास्य : दोन्ही हात जोडून उजव्या-डाव्या बाजूला वाकून नमस्कार करत हसणे

मुक्त हास्य : कंबरेतून खाली वाकून आकाशाकडे हात नेत हसणे

कंठ हास्य : ओठ बंद ठेवून गळ्यातून आवाज काढणे

धनुष्यबाण हास्य : बाण सोडण्यासाठी धनुष्य ज्याप्रमाणे ताणला जातो तशी कृती करत एक, दोन, तीन म्हणत जोरात हसणे

रावण हास्य : रावण ज्याप्रमाणे मग्रुरीने वागायचा, तसे भाव घेऊन इतरांना तुच्छ लेखत हसणे

नवनीत हास्य : रवीने लोणी काढण्याच्या जुन्या पद्धतीप्रमाणे हात मागे पुढे करत हसणे

ताणतणाव कमी करण्यासोबतच हास्य योगाचे शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी देखील फायदे आहेत. मला अनेक वर्षांपासून स्पॉंडेलिसिसचा त्रास होता. हास्य क्लब सुरू झाल्यानंतर होणाऱ्या वेदनांपासून माझी काहीअंशी मुक्तता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT