bamu pet exam 
छत्रपती संभाजीनगर

पीएच.डी.साठी जागा ९०० अन् पेटमध्ये चार हजार उत्तीर्ण! प्रक्रिया थांबविण्याची मागणी 

अतुल पाटील

औरंगाबाद: पीएच.डी. प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेतच चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी पास झाले असून त्याशिवाय इतरही पात्र विद्यार्थी आहेत. पीएच.डी. साठी जागा ९०० आणि पात्र विद्यार्थ्यांची संख्या चार हजाराहून अधिक आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषदच्या सदस्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे. 

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, संशोधन केंद्राच्या संदर्भात प्र. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने अहवाल कुलगुरूंकडे सादर केला आहे. नुकतीच पेट परीक्षा संपली आहे. विद्यापीठ प्रशासनाने पुढील वेळापत्रक घोषित केले आहे.

त्यामुळे प्र. कुलगुरूंचा अहवाल त्वरित व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात यावा. तोपर्यंत पीएच.डी. नोंदणी प्रक्रिया थांबवण्यात यावी. अन्यथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळणे कठीण होईल, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कुलगुरूंनी तत्काळ बैठक बोलवावी. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रा. राहुल म्हस्के यांनी ही मागणी केली आहे.

पेट उत्तीर्ण तसेच पेटमधून सूट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच सीईटीमार्फत प्रवेश घेऊन पदवीप्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांची २२ मार्च ते तीन एप्रिलदरम्यान पीएच.डी.साठी ऑनलाइन नोंदणी तर, एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. विषयनिहाय रिक्त जागा व गाइडची संख्याही २२ मार्चला प्रकाशित करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT