Aurangabad Chikalthana International Airport expansion sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विमानतळ विस्तारीकरण पुन्हा ऐरणीवर

सात अधिकाऱ्यांची समिती करणार १४७ एकरची मोजणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी केंद्रीय उड्डाण मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची भूसंपादन समिती नियुक्त केली आहे. ही समिती आता दक्षिण बाजूने १४७ एकर जमिनीची मोजणी करणार असून, मोजणीनंतर नवा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.

चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतीच केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बैठक घेण्यात आली होती. त्यात झालेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी श्री. मुळे यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन समिती नियुक्त केली आहे.

या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार ज्योती पवार, विमानतळ निदेशक डी. जी. साळवे, नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एस. खरवडकर, भूमी अभिलेखचे दुष्यंत कोळी, महापालिकेच्या नगर विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांचा समावेश आहे.

जागा कमी अन् मोबदलाही कमी

विमानतळाच्या धावपट्टीची लांबी सध्या नऊ हजार ३०० फूट आहे. मात्र मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी १२ हजार फूट करावी लागणार आहे. धावपट्टी विस्तारासाठी विमानतळाच्या उत्तर दिशेने १८२ एकर जमीन भूसंपादनाचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वीच मोजणीचा अहवाल व भूसंपादनासाठी लागणारा खर्च विमानतळ प्राधिकरणास कळविण्यात आला. पण त्यात शेकडो घरे असल्याने जागेसह बांधकामाचाही मोबदला द्यावा लागणार होता. याउलट विमानतळाच्या दक्षिण बाजूने मोकळी जागा असल्याने मोबदला कमी द्यावा लागेल. रक्कम कमी असेल, १८२ ऐवजी १४७ एकरच जमीन संपादित करावी लागणार आहे, असा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार नव्याने मोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amrit Bharat Express explosion : ‘अमृत भारत एक्सप्रेस’मध्ये स्फोट; प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् रूळांवर धावू लागले

Madhuri Elephant Case : माधुरी हत्ती प्रकरण; हायपॉवर कमिटीचे नांदणी मठ व वनताराला संयुक्त निर्देश

Sakoli News : लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले काढायला गेलेल्या साकोलीतील १९ वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी अंत

Motala Accident : भीषण अपघात! गुजरातहून आलेल्या कुटुंबाची इको कार मोताळ्याजवळ पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Tivsa News : परंपरागत गाई-म्हशीच्या खेळाला गालबोट, दगडफेक आणि रोषाचे वातावरण; तिवसा येथे पोलिसांचा बळाचा वापर

SCROLL FOR NEXT