Aurangabad Citizens will have to pay only 50% for water bill sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सेनेचा मास्टरस्ट्राेक; पाणीपट्टी अाता दोन हजार

पालकमंत्री सुभाष देसाई यांचा आढावा बैठकीत निर्णय ः पाणीटंचाईत नागरिकांना मिळणार दिलासा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : नागरिकांना जोपर्यंत मुबलक पाणी मिळत नाही, तोपर्यंत चार हजार ५० वरून पाणीपट्टी ५० टक्के म्हणजेच दोन हजार रुपये करण्यात यावी, असा निर्णय शुक्रवारी झालेल्या पाणीपुरवठ्याच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. प्रशासनाने उपाययोजना राबवून आठ दिवसांत १५ एमएलडी पाणी वाढ करून नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केली. एकीकडे शहरात पाण्यावरून राजकारण सुरू असताना शिवसेनेने विराेधकांना मास्टरस्ट्राेक लगावताना पाणीपट्टी कपात करून नागरिकांना दिलासा दिला.

शहराच्या पाणीप्रश्‍नावर शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शहरात जोपर्यंत समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. तोपर्यंत सध्या आकारली जाणारी चार हजार ५० रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये एवढी करण्यात यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक तथा माजी सभापती राजू वैद्य, आमदार अंबादास दानवे यांनी काल पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान पाणीपट्टी कमी करण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यानुसार माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या कार्याकाळात ठराव घेण्यात आला होता.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चार हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून दोन हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला. त्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे स्पष्ट केले. या निर्णयानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही श्री. पांडेय यांनी सांगितले.

चार दिवसांआड पाणी द्या

प्रशासनाने ४२ मुद्यांवर उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. दरम्यान एमआयडीसीकडून महापालिकेला तीन एमएलडी, हर्सूल तलावातून पाच एमएलडीची वाढ, जायकवाडीतून आणखी सात एमएलडीची वाढ या प्रमाणे आठ दिवसात शहरात १५ एमएलडी पाणी वाढणार असल्याने नागरिकांना समान पाणी वाटप सुरू करून किमान चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा, असे आदेश पालकमंत्री देसाई यांनी प्रशासनाला दिले.

समन्वय समिती स्थापन

शहरासह जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्याकरिता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता व पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना निमंत्रीत सदस्य म्हणून घेतले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT