corona free sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शहर कोरोना मुक्तीकडे

शहरात केवळ दोन पॉझिटिव्ह रुग्ण असून, ते घरीच उपचार घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर काही दिवसांपासून रुग्णांची संख्या रोडावली आहे. आजघडीला शहरात केवळ दोन पॉझिटिव्ह रुग्ण असून, ते घरीच उपचार घेत आहेत. त्यातील एकाचे सात दिवस सोमवारी तर दुसऱ्याचे सात दिवस बुधवारी संपणार आहेत. याकाळात नवा रुग्ण आढळून आला नाही तर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात हजारो रुग्ण बाधित झाले. त्यामुळे महापालिकेला प्रशासनाची उपाय-योजना करताना तारांबळ उडाली. तिसऱ्या लाट मात्र अवघ्या महिनाभरात ओसरली. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. सध्या दोनच पॉझिटिव्ह रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. पुढील पाच दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही तर शहर कोरोना रुग्ण मुक्त होणार आहे. खासगी लॅबचे अहवाल पॉझिटिव्ह.

महापालिकेच्या अहवालानुसार गुरुवारी फक्त दोन जणांच्या चाचण्या झाल्या. काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण बोटावर मोजण्याएवढे आहे. महापालिकेतर्फे घेतलेल्या स्वॅब कलेक्शनमधून सध्या एकही अहवाल पॉझिटिव्ह येत नाही. पण खासगी लॅबमार्फत घेतलेल्या अहवालातून एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT