covid 19 centre in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु

परमेश्वर कोकोटे

चितेगाव (औरंगाबाद): कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बंद पडलेली कोविड केअर सेंटर पुन्हा रुग्णासाठी सज्ज होत आहेत. चितेगाव (ता. पैठण) येथील कोरोना केअर सेंटरची स्वच्छता करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हे कोविड केअर सेंटर पुन्हा रुग्णासाठी सज्ज करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद असलेल्या बायर माॅन्सटो होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील दुमजली इमारतीत सुसज्ज असे साठ खाटाचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. कोरोना संसर्गाच्या वाढत्या काळात पैठण तालुक्यातील हे चौथे कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले होते. परंतू मध्यंतरी काही काळ कोरोना संसर्ग कमी झाल्याने तालुक्यातील बहुतांश कोरोना केअर सेंटर रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे बंद करण्यात आले होते.

आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर रुग्णासाठी सज्ज करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानुसार येथील तलाठी हसनसिद्दीकी, सरपंच शेख वाहेद, ग्रामविकास आधिकारी बळीराम कळमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी  कोरोना केअर सेंटरचा परिसर स्वच्छता, बेड, पंखे, दूरचित्रवाणी संच, स्वच्छता ग्रह, लाईट गेल्यास जनरटर आदीची स्वच्छता करुन निटनेटके करण्यात येत आहे.

या कोरोना केअर सेंटरमध्ये महिला व लहान मुलांची स्वतंत्र व्यवस्था असून एक आधुनिक वेंटीलेटर येथे उपलब्ध आहे.

मध्यंतरी काही काळ कोरोना संसर्ग कमी झाल्याने तालुक्यातील बहुतांश कोरोना केअर सेंटर बंद करण्यात आली होती. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ही कोविड सेंटर खबदारीचा उपयाय म्हणून रुग्णांसाठी सज्ज करत आहोत- चंद्रकांत शेळके (तहसीलदार पैठण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पप्पा तुम्ही दुसरं लग्न करा' मुलींनी प्रकाश राज यांना लग्नाचा दिलेला सल्ला, 12 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न आणि...

Daughter kills Mother : मुलीने केली आईची हत्या, वर्षभर घरातच लपवला मृतदेह, धक्कादायक कारण समोर

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा

Ram Navami 2026: 'या' गावात का साजरा होतो राम आणि सीतेचा विवाह?

Ashok Kharat Fake Baba Case : भोंदू अशोक खरात प्रकरण, जप्त बंदुकीचा परवाना नाशिक प्रशासनानेच दिल्याचे उघड, २१ काडतुसे जप्त

SCROLL FOR NEXT