Aurangabad Course completed To do that Exam preparation sakal
छत्रपती संभाजीनगर

अभ्यासक्रम पूर्ण करायचा की परीक्षेची तयारी?

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपुढे प्रश्‍न; गणित, विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांना चिंता

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ ते १४ मार्च; तर बारावीच्या १४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान पार पडणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपलब्ध कालावधीत विद्यार्थ्यांचा उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करायचा की परीक्षेची तयारी करून घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. परीक्षेची तयारी करताना नेमका कोणता अभ्यास किती करायचा? यावरुन विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळ आहे. तर अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागेल.

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा सराव करता आला नाही. ऑनलाइन-ऑफलाईनच्या माध्यमातून शाळांमध्ये दहावी-बारावीचा जवळपास ७० ते ७५ टक्के अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. तरीदेखील २५ ते ३० टक्के अभ्यासक्रम अद्यापही अपूर्णच आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. सध्या ५० टक्के उपस्थिती असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे. प्रात्यक्षिकांचे नियोजन, व्यवस्थापन व मूल्यमापनाची जबाबदारी शाळा, विद्यालयांवर आहे. दरम्यान, दहावी, बारावीच्या कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमावर प्रश्‍न विचारले जाणार नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. तरी देखील उर्वरित अभ्यासक्रमाचा गुण आराखडा मंडळाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

या आहेत अडचणी

  • सराव आणि उजळणीसाठी मिळतोय कमी वेळ

  • ५० टक्के उपस्थित शाळा सुरु असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास लागतोय वेळ लिखाणाचा सराव पडतोय कमी

  • गणित, विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना चिंता

  • प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापासून बहुतांश विद्यार्थी दूर

कशी घेणार परीक्षा?

गणित व विज्ञान विषयांची ८० गुणांची लेखी परीक्षा; तर प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची असे मूल्यमापन केले जाते. परंतु, सध्या अनेक शाळांध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत, तेथे दिवसाआड विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यामुळे तोंडी परीक्षा कधी? केव्हा? आणि कशी होईल? असे प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT