Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime : चाकूचा धाक; दोन लाखांच्या चेकवर सह्या

सिनेस्टाइल आले अन् चेकसह २७ हजार रुपये घेऊन गेले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी मेडिकल औषधे खरेदी केल्याचे पैसे बाकी राहिले म्हणत साताऱ्याच्या दोघांनी औरंगाबादेतील मेडिकल मालकाला येऊन चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच गल्ल्यातील २७ हजार ६०० रुपये रोख घेत, दोन लाख रुपयांच्या चेकवर बॉडिगार्डच्या मदतीने बळजबरी स्वाक्षऱ्या घेतल्याचा प्रकार १५ सप्टेंबर रोजी घडला होता. मात्र, आधीच रक्तदाबाचा त्रास असलेल्या मेडिकलमालकाने उपचारानंतर फिर्याद दिल्याने १ ऑक्टोबर रोजी दोघांविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रणिक जयंतीलाल ओसवाल (रा. कराड, जि. सातारा) असे त्या आरोपीचे नाव असून प्रीतम पाटील (रा. कराड) असे त्या बॉडिगार्ड आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हरीश विश्वनाथ कुलकर्णी (६०, रा. उल्कानगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे खंडपीठाच्या बाजूला मेडिकल दुकान आहे. ते २०१८ पर्यंत कराड येथील जयंतीलाल ओसवाल यांच्या नवकार इथिकल्स येथून औषधे आणत होते. तेव्हापासून जयंतीलाल यांच्यासोबत हरीश संपर्कात नाहीत.

१५ सप्टेंबर रोजी श्रणीक याने हरीश यांना फोन करून माझी तुमच्याकडे बाकी उरलेली असून लवकर द्या असे म्हणाला. त्यावर हरीश यांनी माझ्याकडे पैसे काही बाकी नाही. २०१८ पासून ‘तुझे बाबा आणि मी संपर्कातही नाही, बाकी निघत असेल तर बाबांना दे, त्यांना बोलतो’ असे म्हणतात आरोपी श्रणिक याने वडील आजारी असल्याचे सांगत बोलणे करून देण्यास नकार दिला.

त्यानंतर हरीश हे दुकानातील कामगार सुधाकर चव्हाणसह दुकानावर आले असता, आधीपासूनच एक दाढीवाला संशयित बसलेला होता. त्याने हरीश यांना काही कळण्याच्या आतच त्यांना मारहाण केली आणि मी ओसवाल यांच्याकडून आलो असून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. त्याचवेळेस श्रणिक याने फोन करून तुमच्यासमोर असलेला माझा बॉडिगार्ड असून पैसे कसे वसूल करायचे त्याला चांगले माहिती आहे, असे म्हणत धमकी दिली.

त्याचदरम्यान संशयित बॉडिगार्डने खिशातून चाकू काढून धाक दाखवत हरीश यांच्या गल्ल्यातील रोख २७ हजार ६०० रुपये काढून घेतले आणि प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीचे चार चेक नवकार इथिकल्सच्या नावाने बळजबरी हरीश यांच्या स्वाक्षऱ्या करून घेतल्या आणि माझे नाव प्रीतम पाटील असून पुढच्या आठवड्यातच मी येईन तेव्हा रोख दोन लाख द्या. नाहीतर माझा चाकू तुझ्यासोबत बोलेल अशी धमकी देऊन निघून गेला. याप्रकरणी वरील दोघांविरोधात पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल घोडके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT