Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी टोळी अटकेत

पैसे घेऊन कोरोनाची लस न घेता लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : व्हीआयपी फंक्शन हॉलजवळील पल्स रुग्णालयात पैसे घेऊन कोरोनाची लस न घेता लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र (Corona Certificate) देणाऱ्या टोळीला मंगळवारी (ता.१४) जिन्सी पोलिसांनी अटक केली. डॉ. शेख रझीउद्दीन फहीमउद्दीन (वय.२७, रा. दिलरस कॉलनी),अबुबकर अल हमीद (वय.२३, रा.इलियास मशीदजवळ, रहेमानिया कॉलनी, आझाद चौक), मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अशपाक (वय २१, रा. गल्ली नं. ३ गणेश कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींकडून नागरिकांचे आधारकार्ड व मोबाइल क्रमांक आरोपी डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीम (वय ३६, रा. घर नं. ६२, दिलरस कॉलनी) याच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले जात. त्यानंतर तो वैजापूर येथील शिवर व मनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिस्टर श्रीमती आढाव व शहेनाज शेख यांच्यामार्फत कोरोनाची लस न घेता लस घेतल्याची नोंदणी करीत असे. (Aurangabad)

त्यानंतर कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले जात असे. यात शासनाची फसवणूक प्रकरणी त्यांच्या विरुद्ध जिन्सी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, निशिकांत भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्ही.एम.केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे, शेख गणी, जगताप, परदेशी, जफर पठाण, बमनात, सरिता कुंडारे यांनी केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.

मेल्ट्रॉन नंतर दुसरा प्रकार

मेल्ट्रॉन रुग्णालयात दोन डमी रुग्ण आढळल्याचे प्रकरण नुकतेच घडले होते. कोरोना चाचणी केलेल्या दोघांनी रुग्णालयात दाखल न होता पैशांचे आमिष दाखवून दुसऱ्याच दोघांना मेल्ट्रॉनमध्ये पाठविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यातील गौडबंगाल अद्यापही कायम असतानाच कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा प्रकारही आता समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT