Aurangabad Crime News Vijay Zinjurde  
छत्रपती संभाजीनगर

रागाच्या भरात घरातून गेलेला तरुण ज्या अवस्थेत सापडला त्याने सर्वांनाच बसला धक्का, सर्वत्रच व्यक्त होतेय हळहळ

दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथून जवळ असलेल्या पांढरी झिंजूर्डे येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह त्याच्याच शेतातील विहिरीत मंगळवार (ता. 23) सकाळी सातच्या सुमारास आढळून आला. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरी झिंजूर्डे येथील विजय जनार्दन झिंजुर्डे (वय 25) हा घरातुन रागाच्या भरात घरांत कुणाला काही न सांगता गेल्या दोन दिवसांपासून  निघून गेला असल्याची तक्रार सोमवारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी केली होती.

त्याचा दोन दिवसांपासून नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वंच ठिकाणी शोध सुरु होता. मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता. मात्र दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्याच्याच शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. विजय हा अत्यंत हुशार मनमिळाऊ स्वभावाचा, सुशिक्षित मुलगा होता. त्याने डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले होते. परिसरात त्याच्या अशा या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Jayant Patil : जयंत पाटील महायुतीसोबत जाणार का? सतेज पाटील यांनी एकाच वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम' सांगितला, 'आपण शाहू, फुलेंचे वारस'

Video : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा! PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : मान्सून पुन्हा सक्रिय होणार ! उत्तर, पूर्व आणि मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता

Automatic Weather Centers : हवामानाचा अचूक अंदाज मिळणार की खोळंबा? रत्नागिरीतील 739 ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित, पण 'या' 42 गावांचं काय?

Satara News : सोशल मीडियावरील चर्चांनंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील स्वतः आले समोर! साताऱ्यातील 'त्या' घटनेचे सांगितले सत्य; मद्यधुंद व्यक्तीबाबत नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT