file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यात रोख एक लाख रुपयांसह दागिन्यांची चोरी

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव(जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) (Paithan) येथील खंडोबा वस्तीवरील एका शेतकऱ्यांच्या घरी बुधवार (ता.पाच) पहाटे अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. यात बैलजोडी खरेदीसाठी बँकेतून काढलेले एक लाख नगदी रक्कम अडीच लाखांच्या जवळपास सोन्याचे ऐवज चोरीला गेले आहे. या बाबत शेतकरी अशोक दामोधर इथापे यानी दिलेली माहिती, अशी की रात्री जेवण करून कुटुंबातील झोपी गेले होते. (Aurangabad Crime News Robbery In Paithan Block)

पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने जिन्याद्वारे घरात प्रवेश करून एका खोलीतील कपाटातील कपडे लत्ते अस्ताव्यस्त करत नेकलेस, गठण, झुंबर, मनीमंगळसूत्र, एकदानी, अंगठ्या असा जवळपास सहा ते सात तोळ्याचे दागिने व खरीप हंगामा शेत मशागत करण्यासाठी बैलजोडी खरेदी घेण्यासाठी बँकेतून काढून ठेवलेली एक लाख रक्कम चोरट्यांनी लपास केल्याचे सकाळी झोपेतून उठल्यावर निदर्शनास आले. या घटनेची पोलिस पाटील किरण वाघ यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात (Bikin Police Station) दिली असता सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, फौजदार जगदीश मोरे, श्वान, ठसे तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी बिडकीन ठाण्यात गणेश इथापे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, हवालदार गोविंद राऊत करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT