Two Wheelers Stealing Gang Aurangabad
Two Wheelers Stealing Gang Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

राज्यात दुचाकी चोरणारी टोळी पकडली, तब्बल २३ दुचाकींसह साडेआठ लाखांचा ऐवज जप्त

सुषेन जाधव

औरंगाबाद : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीतील संशयित आरोपी हे औरंगाबादसह जळगाव, नाशिक, बुलडाणा व जालना जिल्ह्यांत दुचाकी चोरी करून फायनान्स कंपनीच्या असल्याचे सांगत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. टोळीतील सहा जणांकडून तब्बल २३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.


हे आहेत आरोपी
शेखर ऊर्फ आण्णा प्रकाश दांडगे (२६, रा.रेणुकाई पिंपळगाव ता. भोकरदन जि. जालना, ह.मु. वडगाव कोल्हाटी), विलास रामभाऊ कुऱ्हाडे (२४, रा. हिसोडा ता. भोकरदन जि. जालना) यांनी साथीदार श्रीराम ऊर्फ बंडू शैलेंद्रसिंग जोनवाल (रा. लिहा पारध ता. भोकरदन जि. जालना), तेजराव ऊर्फ बाबा रामदास जाधव (रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन जि. जालना), ज्ञानेश्वर ऊर्फ नाना रामदास पवार (रा. मासरूळ ता.जि.बुलडाणा), गजानन फकीरचंद गोठवाल (रा. जळगाव सपकाळ ता. भोकरदन जि. जालना) अशी अटकेतील सहा दुचाकी चोरांनी नावे आहेत.


असा लागला छडा
रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोध घेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, औरंगाबाद ग्रामीण भागात दुचाकी चोरीतील आरोपी शेखर ऊर्फ आण्णा प्रकाश दांडगे आणि विलास कुऱ्हाडे हे दोघे त्यांच्या मूळगावी भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव आणि हिसोडा येथे आले आहे. त्यांनी औरंगाबादसह जळगाव, नाशिक, बुलडाणा व जालना येथून मोठ्याप्रमाणात दुचाकी चोरी केल्या असून बँकेने ओढून आणलेल्या दुचाकी असून त्यांची कागदपत्रे नंतर आणून देतो अशा थापा मारून खेडयापाड्यातील लोकांना विक्री केल्या होत्या. खात्रीशीर माहितीवरून दांडगे आणि कुऱ्हाडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने जळगाव सपकाळ, ता. भोकरदन व मासरूळ ता.जि. बुलडाणा व अन्य ठिकाणच्या लोकांना दुचाकी विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी या सहा जणांच्या ताब्यातून तब्बल २३ दुचाकी, ५ मोबाईल असा एकूण ८ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप सोळंके, जमादार बालू पाथ्रीकर, नामदेव शिरसाठ, श्रीमंत भालेराव, राहुल पगारे, संजय भोसले, बाळासाहेब नवले, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांच्या पथकाने केली.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT